Dussehra 2025 Astrology | विजयादशमी म्हणजेच दसरा हा हिंदू पंचांगानुसार अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दशमी तिथीला साजरा केला जातो. यंदा २ ऑक्टोबर २०२५ रोजी दसऱ्याचा उत्सव आहे. हा दिवस फक्त धार्मिक दृष्ट्या नाही तर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनेही अत्यंत शुभ मानला जातो. यावर्षी दसऱ्याच्या दिवशी रवि योग, सुकर्मा योग आणि धृति योग असा त्रिगुणात्मक शुभ संयोग निर्माण होत आहे. तसेच दुसऱ्याच दिवशी बुध-मंगळ युती होणार आहे. या संयोगामुळे काही राशींना विशेष लाभ होणार असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
मेष रास (Aries) :
मेष राशीच्या लोकांसाठी दसरा अतिशय शुभ ठरणार आहे. या काळात नोकरी व व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. अनेक दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण होतील. तुमच्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल. कौटुंबिक वातावरणात आनंद वाढेल, तर सामाजिक स्तरावरही तुमची प्रतिमा उंचावेल.
Dussehra 2025 Astrology | कर्क रास (Cancer) :
कर्क राशीसाठी विजयादशमीचा दिवस करिअरमध्ये सकारात्मक बदल घेऊन येईल. नोकरीत तुमच्या कामाचं कौतुक होईल आणि प्रमोशनची संधी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमची कामगिरी उत्तम राहील. आर्थिक दृष्ट्याही ही वेळ तुमच्यासाठी लाभदायी ठरेल.
धनु रास (Sagittarius) :
धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ अतिशय भाग्यशाली ठरणार आहे. नोकरीत जबाबदाऱ्या वाढतील आणि त्यातून तुमची प्रगती होईल. अडकलेली कामं पूर्ण होतील. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. वैयक्तिक नात्यांमध्ये गोडवा वाढेल.






