ड्रेसिंग रुममधील चर्चेनं भारतीय क्रिकेट विश्वात खळबळ, गौतम गंभीर म्हणाला…

On: January 3, 2025 1:51 PM
Gautam Gambhir
---Advertisement---

Gautam Gambhir: “मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर खेळाडूंवर संतापले” अशा आशयाचे वृत्त बुधवारी भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममधून बाहेर आले होते. यानंतर प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियावर एकच गोंधळ उडाला. आजी-माजी खेळाडूंनी ड्रेसिंग रूममधील गोष्टी बाहेर येण्यावर आश्चर्य व्यक्त केले. या पार्श्वभूमीवर, गुरुवारी गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी कठोर भूमिका घेत, ड्रेसिंग रूममधील चर्चा बाहेर यायला नको, असे स्पष्टपणे सांगितले.

ड्रेसिंग रूममधील संवादाचा विपर्यास

गंभीर म्हणाले, “खेळाडूंची कामगिरी सुधारण्यासाठी त्यांच्यासोबत साधलेला संवाद माध्यमांनी वेगळ्या वळणावर नेला. ड्रेसिंग रूममधून बाहेर आलेली चर्चा हा केवळ अहवाल आहे, त्यात तथ्य नाही. खेळाडू व प्रशिक्षकांमधला संवाद हा ड्रेसिंग रूममध्येच राहायला हवा, बाहेर येता कामा नये.”

भारतीय क्रिकेट सुरक्षित हातात

गंभीर पुढे म्हणाले, “जोपर्यंत ड्रेसिंग रूममध्ये प्रामाणिक लोक उपलब्ध आहेत, तोपर्यंत भारतीय क्रिकेट सुरक्षित हातात आहे. खेळाडूंना ड्रेसिंग रूममध्ये कायम ठेवणारी एकमेव गोष्ट म्हणजे कामगिरी. हेच माझे प्रामाणिक शब्द होते आणि प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे.”

संघाच्या गरजेनुसार खेळावे

“संघाला जे हवे आहे तसेच खेळावे लागेल. तुम्ही सांघिक खेळात तुमचा नैसर्गिक खेळ खेळू शकता. परंतु, संघाला तुमची गरज असेल तर तुम्हाला एका विशिष्ट प्रकारे खेळावेच लागेल,” असेही गंभीर यांनी स्पष्ट केले.

रोहितच्या अनुपस्थितीबद्दल बोलण्यास नकार

सामन्याआधीच्या पत्रकार परिषदेत रोहित उपस्थित नव्हता. त्याच्या अनुपस्थितीबाबत तसेच तो खेळणार की नाही याबाबत विचारणा करताच गंभीर म्हणाले, “अंतिम एकादश कशी असेल हे तुम्ही मला सांगा! खेळपट्टी पाहिल्यानंतरच मी अंतिम एकादशचा विचार करणार आहे.” रोहितच्या फॉर्मबद्दल विचारले असता, “मी एका व्यक्तीबाबत भाष्य करणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

रोहित-गंभीर यांच्यात संवादाचा अभाव

पाचव्या कसोटीआधी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह खेळपट्टी पाहण्यास पोहोचले. काही मिनिटांत कर्णधार रोहित शर्मा तेथे आला. तिघेही एकमेकांपुढे उभे होते. मात्र, कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षकांदरम्यान संवादाचा अभाव दिसून आला.

महत्त्वाच्या बातम्या- 

रोहित शर्माची क्रिकेटमधून निवृत्ती?, आताच्या घडीची महत्त्वाची घडामोड

कोणत्या कारच्या कंपनीला भारतात सर्वाधिक मागणी?, महत्त्वाची आकडेवारी उघड

देशमुख प्रकरण भोवलं! धनंजय मुंडेंचा पत्ता कट?

नोंदणी विवाहासाठीची प्रक्रिया काय असते?, अर्ज ते कागदपत्रे सर्व माहिती जाणून घ्या

वाल्मिक कराडने केली सर्वात मोठी मागणी!

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now