Dating Fraud l नवी मुंबई पोलिसांनी (Navi Mumbai Police) डेटिंग ॲपवरून (dating app) 33 लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी अटक केलेल्या तरुणाने राजस्थानमध्येही (Rajasthan) अनेकांना फसवले आहे. यात काही पोलिस कर्मचारी व इतर व्यक्तींचा समावेश आहे. सोशल मीडियावरील (social media) मुलींचे फोटो वापरून त्याने या सर्वांना गोड बोलून गळाला लावले आणि पैसे उकळले. नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने (cyber cell) त्याला अटक केल्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत (judicial custody) रवानगी झाली आहे.
राजस्थानमध्येही फसवणूक :
नवी मुंबईत राहणाऱ्या 53 वर्षीय व्यक्तीची डेटिंग ॲपवरून फसवणूक झाली होती. चॅटिंग (chatting) करणाऱ्या तरुणीच्या बोलण्याला भुलून त्याने तिला भेटण्यासाठी 33 लाख रुपये खर्च केले. यानंतरही ती न भेटल्याने त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली असता, तपासात ती तरुणी नसून तरुण असल्याचे समोर आले.
तक्रारदारासह राजस्थानमधीलही अनेकांना गंडा घालून पैसे उकळले आहेत. त्यात पोलिस कर्मचारी, इतरही व्यक्ती फसले आहेत. संजय मीनाने (Sanjay Meena) वापरलेल्या बँक खात्यांच्या (bank accounts) व डेटिंग ॲपच्या मदतीने पोलिस संबंधितांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. काहींनी आपला हनी ट्रॅप (honey trap) झाल्याचे लक्षात येऊनही फजिती टाळण्यासाठी तक्रार करण्यास नकार दिला आहे. संजयने सोशल मीडियावरील मुलींचे फोटो वापरून संबंधितांना भुरळ घालून भेटीची ओढ लावून पैसे उकळले आहेत.






