डॉ. शिरीष वळसंगकरांच्या संपत्तीबाबत मोठी माहिती समोर; वारसांना मिळणार ‘इतके’ कोटी?

On: April 29, 2025 10:34 AM
Dr. Shirish Valsangkar Death Case
---Advertisement---

Shirish Valsangkar |  सोलापूर येथील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांच्या आत्महत्येच्या तपासात आता त्यांच्या मोठ्या आर्थिक गुंतवणुकीची माहिती समोर येत आहे. त्यांनी गेल्या १५ वर्षांत म्युच्युअल फंडांमध्ये तब्बल १६० कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून समजते. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असले तरी, या मोठ्या गुंतवणुकीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

१६० कोटींची एसआयपी गुंतवणूक

डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी १८ एप्रिल रोजी राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असून, अटकेतील महिला कर्मचारी मनीषा मुसळे माने हिची चौकशी आणि कुटुंबीयांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. आत्महत्येमागील ठोस कारण अद्याप समोर आलेले नाही.

डॉक्टरांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी गेल्या १५ वर्षांपासून पद्धतशीर गुंतवणूक योजनेद्वारे (SIP – Systematic Investment Plan) म्युच्युअल फंडांमध्ये (Mutual Funds) सुमारे १६० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. गुंतवणूक तज्ज्ञांच्या मते, १५ वर्षांपूर्वी गुंतवलेल्या १६० कोटींचे मूल्य आज किमान ३०० कोटी रुपये किंवा त्याहून अधिक असू शकते.

Dr. Shirish Valsangkar यांचा वारस कोण?

या प्रचंड गुंतवणुकीचे वारस (Nominee) कोण, हा प्रश्न आता महत्त्वाचा ठरला आहे. डॉ. वळसंगकर यांनी ही गुंतवणूक करताना वारस म्हणून कोणाचे नाव नोंदवले आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. डॉक्टरांचे मृत्युपत्र आणि वारसा हक्काची कागदपत्रे सादर केल्यानंतरच ही रक्कम संबंधित वारसांना मिळू शकेल.

डॉ. वळसंगकरांनी नॉमिनी म्हणून कोणाची निवड केली होती, याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे. ही रक्कम त्यांच्या कायदेशीर वारसांना मिळणार आहे.

डॉ. शिरीष वळसंगकर हे सोलापूरमधील अत्यंत प्रतिष्ठित न्युरोफिजिशियन होते. त्यांनी १९९९ साली ‘एस. पी. इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस’ हे अत्याधुनिक रुग्णालय उभारले. दयानंद कॉलेज आणि डॉ. व्ही. एम. मेडिकल कॉलेजमधून शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी लंडनच्या कॉलेज ऑफ फिजिशियन्समधून एमआरसीपी पदवी मिळवली. त्यांचे रुग्णालय महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणाच्या सीमावर्ती भागातील रुग्णांसाठी आशेचा किरण होते. त्यांनी देश-विदेशात शोधनिबंध सादर केले होते आणि ते हौशी वैमानिकही होते, स्वतःच्या विमानाने ते देशभर प्रवास करत.

News Title- Dr. Valsangkar Suicide: Rs 160 Cr Investment Revealed

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now