डोनाल्ड ट्रम्प पुन्हा वादात! गर्भवती महिलांना दिला ‘हा’ अजब सल्ला

On: September 23, 2025 3:59 PM
Donald Trump
---Advertisement---

Donald Trump | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. नुकतेच त्यांनी भारताविरोधात 50 टक्के टॅरिफ लावला आणि एच-1बी व्हिसाच्या शुल्कवाढीचा निर्णय घेतला. या निर्णयांमुळे भारतीयांमध्ये नाराजी आहे. पण आता ट्रम्प यांनी दिलेल्या एका अजब सल्ल्यामुळे ते अमेरिकेत चर्चेत आले असून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. (Donald Trump pregnancy advice)

गर्भवती महिलांना पॅरासिटेमॉल घेऊ नका असा सल्ला :

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांनी गर्भवती महिलांना अॅसेटामिनोफेन (टायलेनॉल/पॅरासिटेमॉल) याचा मर्यादित वापर करावा, असे सुचवले आहे. या औषधाचा वारंवार वापर केल्यास होणाऱ्या बाळाला ऑटिजमचा धोका निर्माण होऊ शकतो, असा त्यांचा दावा आहे. ऑटिजम (autism) हा विकार मुलांच्या वर्तनावर परिणाम करणारा असून त्यामध्ये मुले इतरांशी कमी संपर्क ठेवतात.

ट्रम्प यांच्या या विधानाला वैज्ञानिक आणि औषधनिर्माण क्षेत्रातील तज्ज्ञांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. आंतरराष्ट्रीय संशोधनानुसार, पॅरासिटेमॉलच्या सेवनाचा ऑटिजमशी थेट संबंध असल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. उलट, गर्भधारणेदरम्यान ताप, अंगदुखी किंवा डोकेदुखीवर डॉक्टर नेहमीच पॅरासिटेमॉल घेण्याचा सल्ला देतात. (Trump paracetamol autism)

Donald Trump | अभ्यासाचा चुकीचा आधार? :

ट्रम्प यांनी दिलेल्या विधानामागे अमेरिकेचे आरोग्य सचिव रॉबर्ट एफ. केनेडी ज्युनियर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या एका अभ्यासाचा आधार घेतला गेला आहे. त्यात पॅरासिटेमॉलचा जास्त वापर आणि ऑटिजमचा धोका यामध्ये संभाव्य संबंध दर्शवला गेला. मात्र, जागतिक वैज्ञानिकांनी या निष्कर्षाला अपुरा आणि दिशाभूल करणारा म्हटले आहे. (Donald Trump pregnancy advice)

याच भाषणात ट्रम्प यांनी लसीकरणाच्या वेळापत्रकावरही प्रश्न उपस्थित केले. “प्रत्येक बाळाला जन्मल्यानंतर लगेच हेपेटायटिस-बीची लस का द्यावी? ती लस 12 वर्षांच्या वयानंतर द्यायला हवी,” असे ट्रम्प म्हणाले. त्यांनी बाळांना दिल्या जाणाऱ्या लसींमधील घटकांमुळेही ऑटिजम होऊ शकतो, असा दावा केला. या विधानामुळे वैद्यकीय तज्ज्ञांमध्ये आणि समाजामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

News Title : Donald Trump’s Strange Advice to Pregnant Women on Paracetamol Sparks Backlash in US

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now