फासाच्या ओढणीसोबत सेल्फी पाठवला?; डॉक्टर आत्महत्या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर

On: October 29, 2025 6:42 PM
Dr. Sampada Munde
---Advertisement---

Dr. Sampada Munde | सातारा (Satara) जिल्ह्यातील फलटण (Phaltan) येथील डॉक्टर संपदा मुंडे (Dr Sampada Munde) यांच्या आत्महत्येप्रकरणी तपासात आता एक अत्यंत खळबळजनक आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी डॉक्टरने आरोपी प्रशांत बनकरला (Prashant Bankar) केवळ मेसेजच नाही, तर गळफास घेतलेल्या ओढणीचा सेल्फी काढून पाठवला होता, अशी माहिती मिळत आहे, ज्यामुळे या प्रकरणाची गुंतागुंत आणखी वाढली आहे.

आत्महत्येपूर्वी ओढणीसोबत सेल्फी? :

डॉ. संपदा मुंडे यांनी आत्महत्येपूर्वी हातावर सुसाईड नोट लिहून पीएसआय गोपाळ बदने (PSI Gopal Badne) याच्यावर बलात्काराचा आणि प्रशांत बनकरवर छळाचा आरोप केला होता. या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरने आत्महत्येपूर्वी प्रशांत बनकरला शेवटचा मेसेज केला होता.

आता सूत्रांकडून मिळालेल्या अधिक धक्कादायक माहितीनुसार, हा शेवटचा मेसेज म्हणजे डॉक्टरने आत्महत्या करण्यासाठी वापरलेल्या आणि लटकवलेल्या ओढणीसोबतचा स्वतःचा फोटो (सेल्फी) होता, जो तिने बनकरच्या मोबाईलवर पाठवला होता. डॉक्टर आणि बनकर यांच्यात यापूर्वी झालेले अनेक कॉल्स आणि व्हॉट्सॲप (WhatsApp) मेसेजेस पोलिसांनी मिळवले आहेत, जे तपासासाठी महत्त्वाचे ठरत आहेत. चाकणकरांनी यापूर्वी सांगितले होते की, डॉक्टरने आत्महत्येची धमकी देणारा मेसेज पाठवला होता, मात्र बनकरचा फोन बंद होता किंवा त्याने ‘तू याआधीही अशा धमक्या दिल्या आहेत,’ असे म्हटले होते.

Dr. Sampada Munde | लक्ष्मीपूजनाच्या रात्रीचा वाद आणि हॉटेलमधील शेवटचे क्षण

रुपाली चाकणकर (rupali chakankar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी लक्ष्मीपूजन होते. त्यावेळी डॉ. मुंडे आणि प्रशांत बनकर यांच्यात फोटो काढण्यावरून किरकोळ वाद झाला होता. फोटो व्यवस्थित न आल्याने झालेल्या वादानंतर डॉक्टर घरातून बाहेर पडून जवळच्या मंदिरात गेल्या होत्या. बनकरच्या वडिलांनी त्यांची समजूत काढून त्यांना घरी आणले होते.

मात्र, त्यानंतर डॉ. मुंडे फलटणमधील मधुदीप हॉटेलमध्ये (Hotel Madhudeep) गेल्या. हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये (CCTV Footage) त्या एकट्याच रूम नंबर ११४ मध्ये जाताना दिसत आहेत. रात्रीच्या वेळी त्या एकट्या हॉटेलमध्ये का आल्या, याचा तपास पोलीस करत आहेत. पोलीस आता सीसीटीव्ही फुटेज, व्हॉट्सॲप मेसेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषण करत असून, यातून आणखी सत्य समोर येण्याची शक्यता आहे.

News title : Doctor Death Selfie Sent Before Death?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now