Doctor Death Case Twist | फलटण (Phaltan) येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्येने राज्य हादरले आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपी अटकेत असताना, आता भाजप (BJP) नेते आणि मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. जप्त केलेल्या मोबाईलमधील चॅटिंगमध्ये एक ‘वेगळाच ट्रँगल’ (Triangle) समोर आल्याचा गंभीर दावा त्यांनी केला आहे, ज्यामुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
चॅटिंगमधील ‘त्रिकोण’ गंभीर, पण… :
मूळची बीडची (Beed) असलेली डॉ. संपदा मुंडे (Dr Sampada Munde) हिने आत्महत्येपूर्वी हातावर पीएसआय (PSI) गोपाळ बदने (Gopal Badne) याच्यावर बलात्काराचा आणि प्रशांत बनकर (Prashant Bankar) याच्यावर छळाचा आरोप केला होता. पोलिसांनी तिन्ही मोबाईल जप्त केले आहेत. यावर मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) म्हणाले की, “आम्ही त्या भगिनीचा आदर करतो, मात्र मोबाईल चॅटिंगमधून जो ‘ट्रँगल’ (Triangle) समोर आला आहे, तो अत्यंत गंभीर असून लोकांसमोर आणण्यासारखा नाही.”
त्यामुळे कुणीही या प्रकरणाचे राजकारण करू नये, असे आवाहन गोरेंनी केले. त्यांनी सांगितले की, “फलटण (Phaltan) प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) आहेत, तिन्ही मोबाईल जप्त आहेत. या जप्त केलेल्या तिन्ही मोबाईलमधील चॅटिंग बघितले तर परिस्थिती खूप वेगळी आहे.” पोलिसांनी ही वस्तुस्थिती अद्याप समोर आणलेली नाही, कारण ते मृत भगिनीचा आदर करत आहेत, असेही ते म्हणाले.
Doctor Death Case Twist | ‘घाणेरडे राजकारण’ थांबवा :
जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी या प्रकरणाचा गैरफायदा घेऊन राजकारण करणाऱ्यांवर टीका केली. ते म्हणाले, “या प्रकरणावरून काही लोक घाणेरडे राजकारण करत आहेत.” सुरुवातीला सुसाईड नोटमधील हस्ताक्षर डॉक्टरचे नसल्याचा आरोप झाला, नंतर कुटुंबीयांनी ते तिचेच असल्याचे सांगितले, या गोंधळाकडेही त्यांनी लक्ष वेधले.
पोलीस चॅटिंगमधील सत्य बाहेर आणत नाहीत, याचा गैरफायदा घेतला जात आहे, असे ते म्हणाले. दरम्यान, या प्रकरणी राज्यभरात आंदोलने होत असून, डॉक्टर महिलेला न्याय देण्याची मागणी जोर धरत आहे. दोन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून, त्यांच्या चौकशीतून आणखी काय समोर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






