Sushma Andhare | फलटण (Phaltan) येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्येने राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक झाली असली तरी, रोज नवीन खुलासे होत आहेत. आता शिवसेना (Thackeray Group) (Shiv Sena Thackeray Group) नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी एक नवीन पुरावा समोर आणत, पीडित डॉक्टरवर पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
‘तो’ रिपोर्ट बदलण्यासाठी होता दबाव :
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी ‘एक्स’वर (X) (formerly Twitter) एक व्हिडीओ शेअर करत या प्रकरणाला नवे वळण दिले आहे. त्यांच्या मते, मृत डॉक्टर महिलेवर केवळ छळच होत नव्हता, तर कामाच्या ठिकाणीही सातत्याने पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव आणला जात होता. याचाच एक पुरावा त्यांनी सादर केल्याचे म्हटले आहे.
अंधारे यांनी एका विशिष्ट घटनेचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, १२ मार्च २०२५ रोजी रत्नशिव संभाजी निंबाळकर (Ratnashiv Sambhaji Nimbalkar) नावाच्या युवकाचा निर्घृण खून झाला होता. मात्र, पोलिसांकडून हा खून ‘अपघाती मृत्यू’ म्हणून दाखवण्याचा प्रयत्न सुरू होता. पीडित डॉक्टरने हा खोटा अहवाल देण्यास स्पष्ट नकार दिला होता, असा दावा अंधारे यांनी केला आहे.
Sushma Andhare | सुषमा अंधारेंचा रुपाली चाकणकरांवर हल्ला :
या संपूर्ण प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापले असून, सुषमा अंधारे यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. अंधारे यांनी पत्रकार परिषदेत चाकणकर यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली. माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsinh Naik Nimbalkar) यांच्यावरही त्यांनी टीका केली.
“राज्य महिला आयोग सध्या राजकीय हेतूने प्रेरित होऊन काम करत आहे,” असा गंभीर आरोप अंधारे यांनी केला. “एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिची बदनामी करण्याच्या प्रकरणी चाकणकरांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आम्ही खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्याकडे केली आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणी दोन्ही आरोपी गोपाळ बदने (Gopal Badne) आणि प्रशांत बनकर (Prashant Bankar) अटकेत आहेत.






