Diwali Special Train | सणासुदीचा काळ जवळ येत असताना प्रवासासाठी रेल्वेत प्रचंड गर्दी होते. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने प्रवाशांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. दिवाळी, पूजा आणि छठ उत्सवाच्या काळात अतिरिक्त प्रवासीभार लक्षात घेऊन नागपूर, पुणे आणि मुंबई दरम्यान विशेष गाड्या चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे. या गाड्यांमुळे नागरिकांना सणासुदीच्या काळात आपल्या गावी सहज पोहोचणे सोपे होणार आहे.
नागपूर–पुणे–नागपूर साप्ताहिक विशेष गाडी :
गाडी क्रमांक 01209 (नागपूर–पुणे) : २७ सप्टेंबर ते २९ नोव्हेंबर दर शनिवारी रात्री ७:४० वाजता नागपूरहून सुटणार आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११:२५ वाजता पुण्यात पोहोचणार. या गाडीच्या एकूण १० फेऱ्या होतील. (Nagpur-pune train)
गाडी क्रमांक 01210 (पुणे–नागपूर) : २८ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर दर रविवारी दुपारी ३:५० वाजता पुण्याहून सुटणार आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६:३० वाजता नागपूरला पोहोचणार. या गाडीच्याही १० फेऱ्या होणार आहेत.
थांबे : उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.
Diwali Special Train | लोकमान्य टिळक टर्मिनस–नागपूर–LTT साप्ताहिक विशेष गाडी :
गाडी क्रमांक 02139 (LTT–नागपूर) : २५ सप्टेंबर ते २७ नोव्हेंबर दर गुरुवारी रात्री १२:२५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबईहून सुटणार आणि त्याच दिवशी दुपारी ३:३० वाजता नागपूरला पोहोचणार.
गाडी क्रमांक 02140 (नागपूर–LTT) : २६ सप्टेंबर ते २८ नोव्हेंबर दर शुक्रवारी दुपारी १:३० वाजता नागपूरहून सुटणार आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४:१० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबईला पोहोचणार.
थांबे : ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.
आरक्षणाची सुविधा :
पुणे–नागपूर विशेष गाडीसाठी आरक्षण ८ सप्टेंबरपासून सुरू झाले आहे, तर LTT–नागपूर विशेष गाड्यांसाठी आरक्षणाची सुविधा ९ सप्टेंबरपासून उपलब्ध आहे. प्रवासी IRCTC च्या वेबसाइटवर किंवा सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवरून आपली तिकिटे बुक करू शकतात.






