दिवाळीत लक्ष्मीपूजन 31 ऑक्टोबर की 1 नोव्हेंबररोजी?; जाणून घ्या शुभ मुहूर्त व पूजा विधी

On: October 25, 2024 2:03 PM
Laxmi Pujan 2025
---Advertisement---

Diwali 2024 | यावर्षी दिवाळीत लक्ष्मीपूजन 31 ऑक्टोबररोजी करायचे की 1 नोव्हेंबरला करायचे, याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहेत. मात्र, शुक्रवारीच म्हणजेच 1 नोव्हेंबररोजीच शास्त्रसंमत असल्याचे पंचागकर्त्यांनी म्हटले आहे. भारतातील जवळ जवळ शंभरपेक्षा अधिक पंचांगांत आणि अन्य सर्व कॅलेंडरमध्ये सुद्धा 1 नोव्हेंबररोजीच लक्ष्मी पूजन करावे, असं म्हटलं आहे. (Diwali 2024)

दिवाळीत 4 दिवस महत्वाचे असतात. त्यात यंदाच्या दिवाळीत 31 ऑक्टोबर गुरुवारी नरक चतुर्दशी, 1 नोव्हेंबर शुक्रवारी लक्ष्मीपूजन, 2 नोव्हेंबर शनिवारी दिवाळी पाडवा आणि 3 नोव्हेंबर रविवारी भाऊबीज आहे.

1 नोव्हेंबर रोजी शुक्रवारी लक्ष्मीपूजन दिलेले आहे. या दिवशी सूर्यास्तानंतर अमावास्या प्रदोषकाळात अल्पकाळ असली तरी सायाह्य काळापासून प्रदोषकाळ समाप्तीपर्यंत म्हणजे सूर्यास्तानंतर सुमारे 2 तास 24 मिनिटे या कालावधीत नेहमीप्रमाणे लक्ष्मीपूजन करता येईल.

लक्ष्मी पूजन शुभ मुहूर्त :

लक्ष्मीपूजनासाठी दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजून 15 मिनिटे तसेच सायंकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजून 35 आणि रात्री 9 वाजून 10 मिनिटांपासून ते 10 वाजून 45 मिनिटांपर्यंत मुहूर्त सांगितले आहेत. या काळात लक्ष्मी पूजन करता येईल. (Diwali 2024)

देवी लक्ष्मीला या काळात त्यांच्या प्रिय वस्तू अर्पण केल्या तर त्याची शुभ फळं मिळतात असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं गेलं आहे. देवी लक्ष्मीला कमळाची फुलं, कमळ बिया, बताशा, खीर आणि गुलाबाचं अत्तर अतिशय प्रिय आहे. (Diwali 2024)

News Title : Diwali 2024 lakshmi pujan vidhi    

महत्वाच्या बातम्या-

एकनाथ शिंदेकडून शिवसेना नावाला कलंक; ‘या’ नेत्याचा मोठा आरोप

अजितदादांची जबरदस्त खेळी, मविआतील ‘या’ बड्या नेत्यांविरोधात टाकला मोठा डाव

राज्यातील ‘या’ 26 ठिकाणी होणार शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना!

मंत्री धनंजय मुंडेंच्या संपत्तीत 5 वर्षात झाली दुप्पट वाढ, आता एकूण संपत्ती किती?

राज्यात ‘या’ 13 ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामना रंगणार!

Join WhatsApp Group

Join Now