Aditya Thackeray | सोशल मीडियावर सध्या माजी मंत्री आणि शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे यांचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांच्यासोबत बॉलिवूड अभिनेत्री भुमी पेडणेकर दिसत आहे. दोघांना मुंबईतील एका रेस्टोरंटमध्ये एकत्र पाहिल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये चर्चांना उधाण आलं आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक विचारत आहेत की, ही भेट लंच डेट होती की बिझनेस मीटिंग?
या व्हिडीओमध्ये आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि भुमी पेडणेकर (Bhumi Pednekar) यांच्यासोबत इतर काही पाहुणे देखील असल्याचं दिसत आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी दोघांचं कौतुक केलं आहे, तर काहींनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.
भूमीने केलं जेवणाचं आयोजन, YGL सदस्यांसोबत खास बैठक :
अनेक सोशल मीडिया पोस्टनुसार, भुमी पेडणेकरने YGL (Young Global Leaders) सदस्य आदित्य ठाकरे आणि क्रिस्टर जोस यांच्यासाठी खास जेवणाचं आयोजन केलं होतं. भुमी ही स्वतःही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या यंग ग्लोबल लीडर्स (YGL) कम्युनिटीची सदस्य आहे. यंदाच्या सप्टेंबर महिन्यात जिनिव्हा येथे झालेल्या यंग ग्लोबल लीडर्स समिट 2025 मध्ये सहभागी होणारी ती पहिली भारतीय अभिनेत्री ठरली होती.
या भेटीदरम्यान झालेल्या चर्चांचा तपशील अधिकृतरीत्या समोर आलेला नसला तरी, या व्हिडीओमुळे दोघांचे नाते आणि व्यावसायिक संबंधांविषयी सोशल मीडियावर विविध चर्चा रंगल्या आहेत.
Aditya Thackeray | भुमी पेडणेकर आणि आदित्य ठाकरे – दोघेही सामाजिक कार्यात आघाडीवर :
भुमी पेडणेकर ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री असून, सामाजिक आणि पर्यावरणविषयक मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग घेते. ती अनेक स्वयंसेवी संस्थांसोबत पर्यावरण संवर्धन आणि स्त्री सबलीकरणाच्या क्षेत्रात कार्य करते. अभिनेत्री सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय असून, चाहत्यांसोबत संवाद साधत राहते.
दुसरीकडे, आदित्य ठाकरे हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे पुत्र आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत. ते महाराष्ट्रातील तरुण आणि प्रभावी राजकारणी मानले जातात. राजकारणासोबतच ते पर्यावरण, शिक्षण आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर काम करतात.
व्हायरल व्हिडीओनंतर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया :
6 नोव्हेंबर रोजी वांद्रे येथील एका रेस्टोरंटमध्ये आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि भुमी पेडणेकर हे इतर काही दिग्गजांसोबत दिसले. या व्हिडीओने काही तासांतच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. अनेकांनी या दोघांच्या उपस्थितीवर कमेंट्स केल्या तर काहींनी त्यांच्या सोशल उपक्रमांचं कौतुक केलं.
पूर्वीही आदित्य ठाकरे आणि अभिनेत्री दिशा पटानी यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या वेळीही सोशल मीडियावर विविध चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे आता पुन्हा आदित्य ठाकरे आणि भुमी पेडणेकर यांचा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे.






