यावर्षी ‘या’ आजारांचा कहर, जाणून घ्या आजारांची संपूर्ण यादी

On: December 2, 2024 12:57 PM
Covid Update
---Advertisement---

Disease l गेल्या काही वर्षांपूर्वी कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार माजवला होता. पण यंदाच्या वर्षी देखील असे अनेक आजारांनी डोकं वर काढलं ज्यामुळे 2024 मध्ये देखील अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. अशातच आता आपण या वर्षी भारतात कोणते नवीन आजार पसरले आहेत यासंदर्भात माहिती जाणून घेऊयात…

Disease l ‘हे’ आजार धुमाकूळ घालणार? :

निपाह व्हायरस : एक झुनोटिक पॅरामीक्सोव्हायरस जो दक्षिणपूर्व आशियामध्ये आहे. या आजाराचा पहिला रुग्ण 2018 मध्ये भारतातील केरळ येथे आढळला होता. तसेच निपाह व्हायरस हा वटवाघुळ किंवा डुकरांद्वारे पसरतो.

झिका व्हायरस : एडीस इजिप्ती द्वारे झिका व्हायरस हा आजार प्रसारित झाला आहे. भारतात झिका व्हायरसचा पहिला रुग्ण हा 2021 मध्ये आढळून आला आहे. तसेच झिका व्हायरसच्या पहिल्या रुग्णाची नोंद केरळ याठिकाणी झाली आहे. मात्र हा आजार पुन्हा एकदा डोकंवर काढणार आहे.

क्रिमियन-काँगो रक्तस्त्राव ताप : हा एक भयानक व्हायरस आहे, या आजाराने गुजरात, केरळ राजस्थान आणि उत्तर प्रदेश याठिकाणी हाहाकार माजवला होता. मात्र यावर्षी देखील हा आजार पुन्हा डोकं वर काढू शकतो.

चांदिपुरा व्हायरल : चांदिपुरा व्हायरल हा व्हायरस डास, टिक्स आणि वाळूच्या माश्यांद्वारे होतो. या आजाराचा भारतात पहिला प्रादुर्भाव 1965 मध्ये महाराष्ट्रात झाला होता. परंतु, हा आजार पुन्हा एकदा फोफावू शकतो.

डेंग्यू : यंदाच्या वर्षी अनेक नागरिकांनी डेंग्यू आजाराचा सामना केला आहे. एडिस इजिप्ती किंवा एडिस अल्बोपिक्टस द्वारे प्रसारित होणाऱ्या डेंग्यू आजाराचा पहिला रुग्ण भारतातील चेन्नई येथे आढळला होता. मात्र आता महाराष्ट्रात या आजाराचे रुग्ण अजूनही आढळत आहेत.

News Title- diseases that have emerged in india 

महत्वाच्या बातम्या-

‘या’ अटी पूर्ण करणाऱ्यांना मिळणार मंत्रीपद; काय आहेत निकष?

ऐन थंडीत पावसाच्या सरी बरसणार, राज्यातील ‘या’ भागांसाठी IMD चा हायअलर्ट

पवार साहेबांनी आर. आर. आबांच्या लेकावर टाकली पक्षाची मोठी जबाबदारी!

12th Fail फेम अभिनेत्याच्या चाहत्यांना धक्का!, सोशल मीडियावर माहिती देत अभिनयाला केला राम राम

महिन्याच्या सुरुवातीलाच आनंदवार्ता! पेट्रोल-डिझेल ‘इतक्या’ रुपयांनी झालं स्वस्त?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now