Bollywood News | बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक साजिद खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी केलेल्या धक्कादायक खुलाशामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. एका मुलाखतीत साजिदने कबुली दिली की, तो आतापर्यंत सुमारे ३५० महिलांसोबत नात्यात राहिला आहे. त्याचबरोबर १३ वर्षांनी लहान अभिनेत्री गौहर खानसोबतच्या नात्याबद्दलही त्याने खुलासा केला. या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा साजिद खानचं नाव चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे.
साजिद खान आणि गौहर खानचं नातं
बॉलिवूडमध्ये २०१८ मध्ये उठलेल्या ‘मी टू’ वादळात अनेक कलाकार आणि दिग्दर्शकांवर गंभीर आरोप झाले होते. त्यात साजिद खानचे नाव अग्रस्थानी होते. त्याच्यावर अभिनेत्रींच्या शोषणाचे गंभीर आरोप झाले होते. या सगळ्यातही साजिद नेहमीच त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिला आहे. अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिससोबतही त्याचं नाव जोडण्यात आलं होतं, पण त्याआधी साजिद अभिनेत्री गौहर खानला डेट करत होता. दोघांचा साखरपुडा झाल्याची चर्चा होती, मात्र हे नातं फार काळ टिकू शकलं नाही.
एका मुलाखतीत साजिदने सांगितलं, “आम्ही एक वर्ष एकत्र होतो. ती एक चांगली मुलगी आहे. मला सार्वजनिकरित्या नावं घ्यायला आवडत नाही, पण आमच्या नात्याची चर्चा आधीच झाल्याने मला काही हरकत नाही. आमच्या साखरपुड्याची मीडियामध्येही चर्चा झाली होती.” साजिद पुढे म्हणाला, “मी आतापर्यंत ३५० महिलांसोबत राहिलो आहे. त्या अनेक मुली आजही मला मिस करत असतील, तर काही माझ्याबद्दल वाईटही बोलत असतील.”
Bollywood News | गौहर खानचा प्रवास
साजिदसोबत ब्रेकअप झाल्यानंतर गौहर खानने स्वतःच्या कारकिर्दीवर लक्ष केंद्रित केलं. ती ‘बिग बॉस’सारख्या रिअॅलिटी शोमधून प्रचंड लोकप्रिय झाली. या काळात तिचं नाव अभिनेता कुशाल टंडनसोबत जोडण्यात आलं, मात्र हे नातंही फार काळ टिकू शकलं नाही. नंतर गौहरने २०२० मध्ये झैद दरबारसोबत लग्न केलं.
आज गौहर खान एक यशस्वी अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. तिचे लाखो चाहते सोशल मीडियावर सक्रिय असतात. ती नेहमीच स्वतःचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहते. सध्या ती तिच्या दुसऱ्या बाळाच्या प्रतीक्षेत आहे. तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे ती सतत चर्चेत राहते.
साजिद खानच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये ‘मी टू’ वादाची आठवण ताजी झाली आहे. दिग्दर्शकाचे हे वक्तव्य त्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल अनेक प्रश्न निर्माण करत आहे. मात्र, या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर गौहर खानने स्वतःचं आयुष्य नव्यानं घडवलं आहे. साजिद खानच्या या विधानानं मात्र, पुन्हा एकदा त्याचं काळा भूतकाळ समोर आणलं आहे, ज्याची चर्चा आता सगळीकडे रंगली आहे.






