उदयनराजेंचा रायगडावरून थेट इशारा, म्हणाले…

On: December 3, 2022 1:29 PM
---Advertisement---

रायगड | छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातले हिरो झाले आहे, असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलं होतं. त्यांच्या विरोधात खासदार उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosale) यांनी रायगडावर जाऊन आक्रोश आंदोलन केलं आहे. यावेळी बोलताना उदयनराजे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

अवमान करणाऱ्यांना वेळ दाखवण्याची वेळ आली आहे. मन आज व्यथित झालं आहे. दुखीत झालं आहे. आज व्यथित होऊन चालणार नाही. पुन्हा एकदा महाराष्ट्रात जाऊन बांधणी करायची आहे, असं म्हणत उदयनराजे (Udyanraje Bhosale) यांनी इशारा दिला आहे.

भारत स्वातंत्र्य झाले, त्यावेळी 3 तुकडे झाले होते. आता 30 तुकडे होतील. आज वाईट वाटत आहे. देशाचे कितीही तुकडे होऊ द्या, मी फक्त माझं स्वार्थ पाहणार असे राजकारणी झाले आहे. पण शिवरायांनी तसा कधी विचार केला नाही. त्यामुळे शिवरायांचं राज्य हे रयतेचं राज्य म्हणून ओळखलं गेलं, असंही उदयनराजे म्हणालेत.

शिवरायांनी सर्वधर्मीयांना एकत्र येण्याचा संदेश दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सन्मानाचं काम आहे. शिवरायांनी आपलं आयुष्य राज्यासाठी वेचलं. त्यांचा अवमान होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही, असंही उदयनराजे म्हणालेत.

आज प्रत्येक राजकीय पक्ष स्वार्थी झाला आहे. शिवरायांना वंदन करायचं पण त्यांनी दिलेल्या सर्व धर्मसमभावाचा संदेश दिला जात नाही. राजकीय पक्षांनी समाजामध्ये तेढ निर्माण केला आहे, अशी टीकाही उदनयराजेंनी केली.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now