टीम इंडियाची तुलना डॉबरमॅन कुत्र्याशी? भारताच्या दिग्गज खेळाडूची टीका

On: June 25, 2025 10:44 AM
Team India
---Advertisement---

Team India | इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाचा लीड्स कसोटीत पाच विकेट्सनी पराभव झाला. याच पराभवानंतर भारताचे माजी यष्टीरक्षक दिनेश कार्तिक यांनी केलेल्या एका विधानामुळे वादाची ठिणगी पडली आहे. कार्तिक यांनी टीम इंडियाची तुलना डॉबरमॅन जातीच्या कुत्र्याशी केल्याने क्रिकेटविश्वात खळबळ माजली आहे. (Team India)

दिनेश कार्तिकने सोशल मीडियावर पाहिलेल्या एका विधानाचा उल्लेख करताना म्हटले की, “टीम इंडियाची फलंदाजी डॉबरमॅनसारखी आहे – डोकं चांगलं, मधला भाग ठीक, पण शेपूट नाही.” हे विधान सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले असून भारतीय क्रिकेटप्रेमींमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

टीम इंडियाच्या फलंदाजीचे तुकड्यांमधील विश्लेषण :

या विधानाचा अर्थ स्पष्ट करताना कार्तिकने सांगितले की, भारताचा टॉप ऑर्डर म्हणजे “डोकं” – जिथे यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल आणि के. एल. राहुल यांनी लीड्स कसोटीत शानदार शतके झळकावली. मधला भाग म्हणजे मिडल ऑर्डर – येथे ऋषभ पंतने दोन्ही डावात शतक ठोकले आणि जडेजा व करुण नायर यांनीही योगदान दिले.

मात्र, शेपटी म्हणजेच टेलएंड फलंदाज मात्र पूर्णतः अपयशी ठरले. पहिल्या डावात ६ बाद ४५३ धावांवर असलेल्या भारताचा डाव केवळ ४७१ धावांवर संपला, तर दुसऱ्या डावात ६ बाद ३३५ धावा असताना संघ ३६४ धावांवर ऑलआउट झाला.

Team India | इंग्लंडची शेवटची फळी ठरली निर्णायक :

या तुलनेत इंग्लंडच्या खालच्या फळीने पहिल्या डावात तब्बल १८९ धावा फटकावल्या, ज्यामुळे त्यांच्याकडे निर्णायक आघाडी मिळाली. भारताच्या शेवटच्या ५ फलंदाजांकडून मात्र फक्त ५५ धावांचे योगदान मिळाले. यामुळेच सोशल मीडियावर भारतीय टेलएंडर्सच्या कामगिरीवर टीका झाली. (Team India)

दिनेश कार्तिकचे हे विधान त्याच्या वैयक्तिक निरीक्षणाच्या आधारे असले तरी, संघाच्या तुलनेत डॉबरमॅनसारखा उल्लेख काही क्रिकेटप्रेमींना खटकला आहे. काहींनी यावर खिल्ली उडवली असली तरी अनेकांनी यामध्ये तथ्य असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे.

News Title: Dinesh Karthik Compares Team India to a Doberman Dog; Sparks Controversy After Leeds Test Loss

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now