Dhule Election Result | धुळे महापालिका निवडणूक 2026 मध्ये भाजपने मोठा विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. एकूण 74 जागांपैकी 50 जागांवर भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळवला असून, त्यामुळे धुळे महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला आहे. मतदारांनी भाजपवर मोठा विश्वास दाखवत शहराच्या कारभाराची सूत्रे त्यांच्या हाती दिली आहेत.
कोणत्या पक्षाने किती जागा जिंकल्या? :
राज्यातील 29 महापालिकांच्या निकालांमध्ये धुळे शहराचा निकाल विशेष लक्षवेधी ठरला आहे. चार जागांवर भाजपचे उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले होते, तर उर्वरित 70 जागांसाठी मतदान पार पडलं होतं. सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या 38 जागांचा आकडा भाजपने सहज पार करत 50 जागांवर विजय मिळवला आहे. (Dhule Municipal Corporation Result 2026)
या निवडणुकीत भाजपने 50 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. त्याखालोखाल एमआयएमने 10 जागांवर विजय मिळवला असून राष्ट्रवादी काँग्रेसला 8 जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेला (शिंदे गट) 5 जागा मिळाल्या असून इतर पक्ष आणि अपक्षांना मिळून 1 जागा मिळाली आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे गट), काँग्रेस, मनसे आणि राष्ट्रवादी एसपी यांना मात्र खातेही उघडता आलेलं नाही.
Dhule Election Result | धुळे राजकारणात भाजपची पकड मजबूत :
धुळे महापालिकेतील या निकालामुळे शहरातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाला असून भाजपची ताकद अधिक मजबूत झाल्याचं दिसत आहे. स्वतंत्र लढत देऊनही भाजपने एवढं मोठं यश मिळवणं हे पक्षाच्या संघटनात्मक ताकदीचं द्योतक मानलं जात आहे. (Dhule Election Result 2026)
तसेच आगामी काळात धुळे शहराच्या विकासकामांवर भाजपचा ठसा अधिक स्पष्टपणे उमटेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






