मस्साजोग प्रकरण भोवले, धनंजय मुंडेंना मंत्रीमंडळात मिळणार डच्चू?

On: December 15, 2024 12:30 PM
Dhananjay Munde
---Advertisement---

Dhananjay Munde | महायुती सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराला अवघे काही तास राहिले आहेत. नागपूरमध्ये आज हा सोहळा पार पडणार आहे. यासाठी नागपुरात जय्यत तयारी करण्यात आली आहे. महायुतीमध्ये ज्यांची मंत्रीपदी वर्णी लागणार, त्यांना काल रात्रीपासूनच फोन करण्यात येत आहेत. अशात राष्ट्रवादी गटाकडून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. (Dhananjay Munde )

देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात काही जुन्या नेत्यांना पण संधी देण्यात येणार आहे. तर काहींना डच्चू देण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून तिघांच्या नावाचा पत्ता कट झाल्याचे समोर येत आहे. दीपक केसरकर, तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार यांना डच्चू देण्यात आल्याची चर्चा आहे.

धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद हुकणार?

अशातच अजित पवार गटाच्या शिलेदारांच्या यादीत अद्याप धनंजय मुंडे यांचे नाव समोर आले नाही. त्यामुळे त्यांना मंत्रीमंडळात डच्चू मिळणार काय?, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. आतापर्यंत अजित पवार गटाकडून चार आमदारांना फोन गेल्याची माहिती आहे. त्यात आदिती तटकरे, अनिल पाटील यांना सुनील तटकरे यांनी फोन केल्याचे समजते. तसेच, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ यांना देखील मंत्रीपदासाठी फोन करण्यात आल्याची माहिती आहे.

मात्र, यामध्ये धनंजय मुंडे यांचे नाव अद्याप समोर आले नाही. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच बीडमध्ये मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. यावरून संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. गेल्या सहा दिवसांपासून मस्साजोग ग्रामस्थांकडून या प्रकरणी संताप व्यक्त केला जातोय. या प्रकरणामुळे मुंडे (Dhananjay Munde ) यांना डच्चू मिळणार की काय?, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

‘या’ महिला आमदारांना मिळाली संधी?

दुसरीकडे, भाजपाकडून रविंद्र चव्हाण यांना स्थान देण्यात आल्याचे समजते आहे. फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळात यंदा महिला आमदारांची देखील वर्णी लागणार आहे. विधानसभेत भाजपाच्या 14, शिवसेनेच्या 2 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 4 महिला आमदार निवडून आल्या. सध्या ज्या आमदारांची नावं मंत्रीपदासाठी सर्वाधिक चर्चेत आहेत त्यात भाजपाकडून पंकजा मुंडे, मेघना बोर्डीकर आणि माधुरी मिसाळ यांचा समावेश आहे. तर राष्ट्रवादीकडून आदिती तटकरे यांच्या नावाचा समावेश मंत्रीमंडळामध्ये (Maharashtra Cabinet expansion) करण्यात आल्याची माहिती आहे. (Dhananjay Munde)

News Title : Dhananjay Munde will get a place in the cabinet or not

महत्वाच्या बातम्या –

फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळात ‘या’ लाडक्या बहीणींना मंत्रिपदाची लॉटरी?

अवघ्या काही तासात राज्याला मिळणार नवे मंत्री; ‘या’ नेत्यांच्या नावांची चर्चा

ग्राहकांना सुखद धक्का! सोनं झालं स्वस्त, ‘इतक्या’ रुपयांनी उतरले भाव

मंत्रीपदासाठी भाजपकडून पहिला फोन नितेश राणेंना, अजून कुणाकुणाला फोन?

आज या’ राशींचं भाग्य खुलणार, राजकारणात लागणार मोठ्या पदाची लॉटरी

Join WhatsApp Group

Join Now