Dhananjay Munde | राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते तथा मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नीच्या कारचा अपघात झाला आहे. धनंजय मुंडेंच्या पत्नीची कार आणि ट्रॅव्हल बसची जोरदार धडक झाली. पुणे-सोलापूर महामार्गावर हा अपघात घडला. यामध्ये राजश्री मुंडे किरकोळ जखमी झाल्या आहेत. (Dhananjay Munde )
राजश्री मुंडे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. सोरतापवाडी या ठिकाणी ही घटना घडली. राजश्री मुंडे यांची कार आणि ट्रॅव्हल बसची आमने-सामने धडक झाली. पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला. या घटनेची माहिती मिळताच तातडीने स्थानिक पोलिस आणि आपत्कालीन सेवा तेथे दाखल झाली.
राजश्री मुंडे यांच्या कारचा अपघात
या अपघातानंतर राजश्री मुंडे यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी माहिती दिली, त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यांना काही वेळातच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. (Dhananjay Munde )
धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे या बीडहून मुंबईकडे जात होत्या. या दरम्यानच सोरतापवाडी या ठिकाणी एका खासगी ट्रॅव्हल्सला त्यांच्या कारने मागून धडक दिली. या अपघातात राजश्री मुंडे यांना किरकोळ दुखापत झाली आहे. (Dhananjay Munde )
News Title : Dhananjay Munde Wife Car Accident
महत्वाच्या बातम्या –
‘या’ जगप्रसिद्ध गायकाचा दुर्दैवी अंत, तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू
विधानसभेसाठी वंचितची तिसरी यादी जाहीर; 30 उमेदवारांच्या नावाची घोषणा
स्वामींच्या कृपेने आज ‘या’ राशींच्या मनोकामना पूर्ण होणार!






