करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्यात कोर्टात काय घडलं?, वाचा A to Z माहिती

On: March 29, 2025 3:41 PM
karuna sharma
---Advertisement---

Dhananjay Munde | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि करुणा शर्मा (Karuna Sharma) यांच्यातील पोटगी विवाद सध्या न्यायालयात चर्चेचा विषय ठरत आहे. वांद्रे सत्र न्यायालयाने करुणा शर्मा यांना दर महिन्याला दोन लाख रुपयांची पोटगी देण्याचा अंतरिम आदेश दिला होता, ज्याविरोधात धनंजय मुंडे यांनी माझगाव सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर २९ मार्च २०२५ रोजी सुनावणी झाली.

विवाह अधिकृत नाही-

धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केला की, धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यात अधिकृत विवाह झालेला नाही. त्यामुळे, पोटगी देण्याचा आदेश योग्य नाही. त्यांनी स्पष्ट केले की, दोघांमध्ये परस्पर संमतीने संबंध होते, परंतु त्यांना पती-पत्नीचा अधिकृत दर्जा नाही. तसेच, करुणा शर्मा आर्थिकदृष्ट्या सक्षम असून, त्यांचे वार्षिक उत्पन्न सुमारे 15 लाख रुपये आहे आणि त्या नियमितपणे आयकर भरतात. त्यामुळे, त्यांना पोटगीची आवश्यकता नाही, असा युक्तिवाद करण्यात आला.

न्यायालयाची विचारणा आणि पुढील सुनावणी

न्यायालयाने विचारणा केली की, जर विवाह अधिकृत नाही, तरीही दोन मुलांचे पालकत्व मान्य केले आहे का? यावर मुंडे यांच्या वकिलांनी सांगितले की, धनंजय मुंडे यांनी मुलांना स्वीकारले आहे, परंतु करुणा शर्मा यांच्याशी विवाह केला नाही. न्यायालयाने करुणा शर्मा यांच्या वकिलांना विवाहाचे पुरावे सादर करण्यास सांगितले असून, पुढील सुनावणी ५ एप्रिल २०२५ रोजी होणार आहे.

करुणा शर्मा यांच्या वतीने विवाहाचे पुरावे-

करुणा शर्मा यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, वर्ष 1998 मध्ये करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांचा विवाह झाला होता. त्या विवाहानंतर त्यांना अपत्य झाले असून, एकत्र राहिल्याचे आणि त्यांच्या सहजीवनाचे पुरावे त्यांच्याकडे आहेत. यामध्ये दोघांचे फोटो आणि इतर दस्तऐवजांचा समावेश आहे.

मात्र न्यायालयाने करुणा शर्माच्या वकिलांना विचारलं की, या विवाहाचे प्रत्यक्ष पुरावे काय आहेत? त्यावर त्यांनी थेट उत्तर न देता, आवश्यक पुरावे सादर करण्यासाठी थोडा वेळ मागितला. न्यायालयाने त्यांच्या विनंतीला मान्यता देत पुढील सुनावणीसाठी 5 एप्रिल 2025 ही तारीख निश्चित केली आहे.

News Title : Dhananjay Munde vs. Karuna Sharma: Alimony Case Updates

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now