Dhananjay Munde | महाराष्ट्राचे कृषीमंत्री तथा अजित पवार गटाचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांची मुंबईतील रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांना आज मुंबईतील सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना गेल्या अनेक दिवसांपासून पित्त आणि पोटदुखीचा (Dhananjay Munde ) त्रास होता.
अशात कामकाज आणि सभा, दौरे यामुळे त्यांचं प्रकृतीकडे दुर्लक्ष होत होते. मात्र आता त्यांचा त्रास जास्त वाढल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली आहे. आज धनंजय मुंडेंच्या पित्ताशयावर (gall bladder) डॉ.अमित मायदेव यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
धनंजय मुंडे यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली
सध्या धनंजय मुंडे (Dhananjay Munde ) यांची प्रकृती स्थिर असून त्यांना डॉक्टरांनी आणखी चार ते पाच दिवस रुग्णालयातच विश्रांती व पुढील उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे. शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंडेंच्या तब्येतीची दूरध्वनीवरून विचारपूस करत काळजी घेण्याचा सल्ला दिला.
पित्ताशयाच्या त्रासामुळे रुग्णालयात उपचार
तर, आमदार पंकजा मुंडे यांच्यासह माजी खासदार प्रीतमा मुंडे यांनी देखील रुग्णालयात धनंजय मुंडे यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीबद्दल विचारपूस केली. सध्या धनंजय मुंडे (Dhananjay Munde ) हे रुग्णालयातच असून त्यांची प्रकृती देखील आता स्थिर आहे.
मागील दोन दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्यावर उपचार सुरु असून रविवारी पित्ताशयाची पिशवी काढण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. मागील काही दिवसांपासून पित्ताशयाचा त्रास त्यांना होत असल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
News Title – Dhananjay Munde underwent surgery
महत्त्वाच्या बातम्या-
“त्याने पँटची चैन उघडली अन् माझा हात…”, प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
“लाडकी बहीण योजनेसाठी पैसे नसतील तर राज्यपालांचा बंगला विका”
“शरद पवार दंगली घडवण्याचं काम करत आहेत”; ‘या’ नेत्याचा थेट आरोप
“देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणातले खलनायक”; संजय राऊतांची टीका
पुण्यातील धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचं थैमान; खडकवासलातून विसर्ग वाढवला






