धनंजय मुंडे राजीनामा देणार?, स्वतः माहिती देत केला मोठा खुलासा

On: January 2, 2025 8:27 PM
Dhananjay Munde
---Advertisement---

Dhananjay Munde | महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात झालेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. या प्रकरणात मुख्य आरोपी वाल्मिक कराड याने सीआयडी समोर शरणागती पत्करल्यानंतर, राजकीय दबाव वाढत चालला आहे. या सर्व घडामोडींमध्ये खाद्य व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणी होत आहे, परंतु मुंडे यांनी त्यांच्या राजीनाम्याची गरज नाही असं म्हटलं आहे.

माझा प्रभाव नाही-

संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर विरोधकांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर निशाणा साधला आहे. विरोधकांचा आरोप आहे की वाल्मिक कराड हा मुंडे यांचा जवळचा व्यक्ती असून, त्यांच्या राजकीय प्रभावामुळे कराड यांना संरक्षण मिळत होतं. या आरोपांना उत्तर देताना मुंडे यांनी स्पष्ट केलं की या तपासात त्यांचा कुठलाही प्रभाव होणार नाही आणि ते न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करणार आहेत.

धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की त्यांच्या राजीनाम्याची गरज नाही. त्यांनी स्पष्ट केलं की सीआयडी ही या प्रकरणाची तपास करत आहे आणि त्यांचा या तपासात कुठलाही प्रभाव नाही. मुंडे यांनी या प्रकरणातील आरोपींना शिक्षा मिळावी यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

राजीनाम्याची मागणी केली-

संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यात सामाजिक आणि राजकीय अशांती निर्माण झाली आहे. विविध राजकीय पक्षांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामनिया यांनीही मुंडे आणि त्यांच्या बहिण पंकजा मुंडे यांना मंत्रिपद सोडण्याची मागणी केली आहे. मुंडे भाऊ-बहीण मंत्रिपदावर असतील तर तपास प्रभावित होऊ शकते, असं त्या म्हणाल्यात.

संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी न्याय मागण्यासाठी आवाज उठवला आहे. त्यांच्या मुलीने सांगितलं की पोलिस व्यवस्था योग्यरीत्या काम करत नसल्यानं आरोपींना अटक करण्यात विलंब होत आहे. त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा असं यावेळेस म्हटलं आहे.

News Title : dhananjay-munde-under-pressure

महत्त्वाची बातमी-

लाडकी बहीण योजनेसंदर्भात फडणवीस सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय!

संतोष देशमुख हत्या प्रकरणात ठाकरे गटाने केली सर्वात मोठी मागणी!

अजितदादांच्या ताफ्यामध्ये वाल्मिक कराडची गाडी! शरद पवारांच्या नेत्याचा गंभीर आरोप

भुजबळांच्या मंत्रीमंडळ एंट्रीसाठी धनंजय मुंडेंची विकेट?, बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

छगन भुजबळ भाजपमध्ये कधी प्रवेश करणार? महत्वाची माहिती समोर

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now