धनंजय मुंडेंची फॅशन शोला उपस्थिती, मात्र अजितदादांच्या दौऱ्याला मारली दांडी!

On: April 2, 2025 8:01 PM
munde dhananjay
---Advertisement---

Dhananjay Munde | राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी प्रकृती ठीक नसल्याचे कारण देत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बीड (Beed) दौऱ्यास उपस्थित राहणं शक्य नसल्याचं जाहीर केलं होतं. मात्र त्याच रात्री मुंबईतील फॅशन शोमध्ये त्यांची हजेरी लागल्याने आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

रात्री फॅशन शोला उपस्थिती-

बुधवारी अजित पवारांचा बीड जिल्हा दौरा नियोजित होता. त्याआधीच धनंजय मुंडेंनी (Dhananjay Munde) सोशल मीडियावर पोस्ट करत आपली तब्येत खराब असल्याचं सांगितलं. त्यांनी लिहिलं, “मी पूर्ण वेळ उपस्थित राहणार होतो, पण प्रकृती बरी नसल्याने उपचारासाठी मुंबईला यावं लागलं.” त्यांनी कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी ही पोस्ट केल्याचंही स्पष्ट केलं.

मात्र याच दिवशी मंगळवारी रात्री धनंजय मुंडे D(hananjay Munde) मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे झालेल्या एका फॅशन शोमध्ये हजेरी लावताना दिसले. या शोमध्ये त्यांच्या मुली वैष्णवी मुंडे हिने सहभाग घेतला होता. त्यामुळे ते कार्यक्रमाला उपस्थित राहिले, याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

मुलीसाठी खास उपस्थिती

धनंजय मुंडे यांनी ज्या दिवशी बीड दौऱ्यातून अनुपस्थिती दर्शवली, त्याच रात्री एका सार्वजनिक कार्यक्रमात त्यांची उपस्थिती समोर आल्याने विरोधक आणि राजकीय निरीक्षक यांच्यात टीका-टिप्पणीला सुरुवात झाली आहे. बीडचे पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस उपस्थित होते, परंतु धनंजय मुंडे अनुपस्थित राहिले.

या बैठकीत जिल्ह्यातील विकासकामांचा आणि विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. मात्र, पक्षप्रमुखांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत गैरहजर राहून एका फॅशन शोला हजेरी लावल्यामुळे मुंडे यांच्यावर टीका होणं स्वाभाविक ठरत आहे.

News Title – Dhananjay Munde Skips Beed Visit, Attends Fashion Show

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now