सरपंच संतोष देशमुख प्रकरणी मंत्री धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया!

On: December 20, 2024 8:17 PM
Dhananjay Munde
---Advertisement---

Santosh Deshmukh Murder Case | बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी हत्या झाल्याची घटना घडली आहे. मात्र या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागे राजकीय कनेक्शन असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

या धक्कादायक प्रकरणात बीडचे राजकीय नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे वाल्मिक कराड यांच्या नातेवाईकांचा हात असल्याचा आरोप केला जात आहेत. याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले मुंडे?

माध्यमांशी संवाद साधत असताना मुंडेंनी देशमुख हत्ये प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. मुंडे म्हणाले की, देशमुखांची (Santosh Deshmukh Murder Case) हत्या ही व्यवहाराच्या प्रकरणावरुन झाली आहे. देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी तपास व्हावा, तपास यंत्रणेच्या माध्यमातून खरी गोष्ट बाहेर येईल त्याच वेळी दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल.

मुंडे नेत्यांच्या निशाण्यावर-

मात्र विधानसभा निवडणुकीनंतर अद्यापही महायुतीचे खातेवाटप झाले नाही. दरम्यान आता खातेवाटपापूर्वीच मंत्री धनंजय मुंडे हे सर्वपक्षीय नेत्यांच्या निशाण्यावर आले आहेत. परंतु, आता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे आता बीड हत्याकांड प्रकरण मंत्री धनंजय मुंडेंना भोवणार असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे.

सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case)  हत्या प्रकरणानंतर अवघ्या काहीच दिवसात मंत्री धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मात्र आता धनंजय मुंडेंचे नाव या हत्ये प्रकरणात वारंवार घेतलं जात आहे. कारण वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंचे अत्यंत जवळचे आहेत. याशिवाय विरोधी पक्षाने मागणी केली तरी देखील वाल्मिक कराडवर अद्याप कारवाई करण्यात आलेली आहे.

News Title : dhananjay munde on santosh deshmukh murder case

महत्त्वाच्या बातम्या-

संतोष देशमुख हत्या प्रकरण धनंजय मुंडेंना भोवणार?

बाईकवर आले, हातात 10 मोबाईल; संजय राऊतांच्या घराबाहेर काय घडलं?

सरपंच हत्या प्रकरणी मुख्यमंत्री ॲक्शनमोडमध्ये; सर्वात मोठा निर्णय घेतला

महायुतीकडून ‘या’ लाडक्या बहिणींना मिळाला धोका?

“वाल्मिक कराडला सोडणार नाही”; सरपंच हत्याप्रकरणी फडणवीस आक्रमक

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now