सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंनी केली फाशीची मागणी!

On: December 26, 2024 4:25 PM
Dhananjay Munde
---Advertisement---

Dhananjay Munde l बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि चिंताजनक आहे, त्यामुळे स्थानिक समुदायात खूप अस्वस्थता निर्माण झाली आहे. संतोष देशमुख हे त्यांच्या गावात एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व होते आणि त्यांच्या हत्येने स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि रोष निर्माण झाला आहे.

आरोपींना फाशीची शिक्षा द्या :

यासंदर्भात मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र या भेटीनंतर राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मात्र यावेळी धनंजय मुंडे यांनी संतोष देशमुख यांच्याबाबत आदर व्यक्त केला. तसेच यावेळी धनंजय मुंडे स्पष्टपणे म्हणाले की, संतोष देशमुख यांच्या हत्येचे गुन्हेगार जे कोणी आहेत, त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहीजे.

धनंजय मुंडे यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागचे सर्व गुन्हेगार शोधून कठोर शिक्षा देण्यासाठी पोलीस यंत्रणेला सूचना देखील दिल्या आहेत. तसेच या प्रकरणात वाल्मिक कराड यांचे नाव समोर आले आहे, जे धनंजय मुंडे यांच्या जवळचे असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे राजकीय वर्तुळातून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू झाली आहे.

Dhananjay Munde l सरपंच हत्येप्रकरणी तपास यंत्रणेला वेग :

दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. सीआयडीचे अप्पर महासंचालक तपासासाठी बीडमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे लवकरत लवकर या हत्येप्रकरणाचा मुख्य आरोपी देखील समोर येईल.

मात्र सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. विविध राजकीय पक्षांचे आमदार आणि नेते या प्रकरणातील आरोपींवर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. त्यामुळे लवकरच आरोपी जेरबंद होण्याची शक्यता आहे.

News Title : Dhananjay Munde On Santosh deshmukh Murder 

महत्वाच्या बातम्या –

तब्बल ‘इतक्या’ वर्षांपासून अक्षय आणि मोहिनी वाघचे संबंध! संपूर्ण प्रेमप्रकरण आलं समोर

अखेर सतीश वाघ हत्येमागचा मास्टरमाइंड समोर! …अत्यंत जवळच्या व्यक्तीनेचं काढला काटा

संतोष देशमुख प्रकरणी सुरेश धसांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट!

पुण्यातील ‘या’ भागात मद्यधुंद कारचालकाचा हैदोस! तब्बल ‘इतक्या’ वाहनांना दिली धडक

सिनेमालाही लाजवेल असं हत्याकांड, सतीश वाघ हत्याप्रकरणी पोलिसांचा मोठा खुलासा

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now