Dhananjay Munde | मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जीआर काढल्यानंतर नवे वादंग सुरू झाले आहेत. या गॅझेटमध्ये काही ठिकाणी बंजारा समाजाची नोंद एसटी प्रवर्गात असल्याने बंजारा समाजाने आपला समावेश एसटीमध्ये करण्याची मागणी केली आहे. मात्र या मागणीला आदिवासी समाजाकडून तीव्र विरोध होत असून वातावरण तापले आहे.
धनंजय मुंडे यांच्या विधानावरून बंजारा समाज आक्रमक :
बीडमध्ये झालेल्या सभेत बोलताना माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी बंजारांच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला. पण यावेळी त्यांनी “वंजारा आणि बंजारा एकच आहेत” असे विधान केले. या वक्तव्यामुळे बंजारा समाज आक्रमक झाला आहे.
बंजारांनी स्पष्ट केले की, “वंजारा आणि बंजारा वेगळे आहेत, तुम्ही आमच्या ताटातील अडीच टक्के आरक्षण आधीच घेतले आहे. आता ‘वंजारा-बंजारा एकच’ हा शब्द मागे घ्या,” अशी मागणी करत घोषणाबाजी सुरू केली. परिणामी मुंडे यांच्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
Dhananjay Munde | बंजारांची एसटी आरक्षणाची मागणी :
हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा समाजाचा (Banjara Community) एसटी प्रवर्गात समावेश करावा, अशी भूमिका बंजारांनी घेतली आहे. राज्यभर मोर्चे काढून समाजाने ताकद दाखवली आहे. मात्र या मागणीला आदिवासी समाजाने विरोध दर्शविल्याने बंजारा विरुद्ध आदिवासी असा संघर्ष उभा राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Dhananjay Munde Controversy)
एकीकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही, तर दुसरीकडे बंजारांचा एसटी आरक्षणाचा मुद्दा पुढे आला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांच्या विधानाने परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाली आहे. आता सरकार या प्रश्नातून मार्ग कसा काढते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






