अमित शाहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया; म्हणाले..

On: July 22, 2024 12:38 PM
Dhananjay Munde Big Statement On Amit Shah Slam To Sharad Pawar
---Advertisement---

Dhananjay Munde | भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यात भाजपच्या महाअधिवेशनात राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवारांवर हल्लाबोल केला. शरद पवार हेच भ्रष्टाचाराचे सूत्रधार असल्याचं अमित शाह म्हणाले. सरकारमध्ये भ्रष्टाचार वाढवण्याचं काम हे शरद पवारांचं आहे. देशात भ्रष्टाचार करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते फक्त शरद पवारांनी केलं आहे. “मी डंके के चोट पर सांगत आहे”. असा घणाघात अमित शाह यांनी केला.

“काहीतरी तथ्य असल्याशिवाय अमित शाह बोलणार नाहीत”

शरद पवार यांच्या सरकारच्या काळात मराठा आरक्षण गायब होतं. तसेच 2014 साली भाजप सरकार जसं आलं तेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळालं. अमित शाह यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे. त्यावर धनंजय मुंडेंनी मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, “अमित शाह बोलल्यानंतर मी उत्तर देणं योग्य नाही. मात्र काहीतरी तथ्य असल्याशिवाय अमित शाह बोलणार नाहीत”, असं धनंजय मुंडे (Dhananjay Munde)  म्हणाले.

विशाळगडाच्या प्रकरणानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी एक चकार शब्दही काढला नाही. त्यावरून देखील धनंजय मुंडेंनी (Dhananjay Munde) वक्तव्य केलं आहे. उद्धव ठाकरे धारावी संदर्भात अनेक आरोप करतात. धारावी अडाणींच्या खिशात घालण्याचा प्रयत्न महायुती करतेय, असा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री असताना शेकलीन नावाच्या कंपनीला तुम्हीच काम दिलं होतं. ते कोणाच्या काळात रद्द झालं आणि अडाणींना दिलं? याचा अभ्यास माध्यमांनी करावा, असं मुंडे म्हणाले.

धारावीच्या टेंडर प्रक्रियेबाबत उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावं. फक्त आमचा उपयोग हा केवळ लोकसभेसाठी केला आहे. आम्हाला वाऱ्यावर सोडलं असल्याचं केवळ मुस्लिम समाज म्हणत आहे, असं धनंजय मुंडे (Dhananjay Munde) म्हणाले आहेत.

“स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे माझे गुरूवर्य आहेत”

स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे माझे गुरूवर्य आहेत. मात्र, माझे खरे गुरू उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत. अजित पवार यांनी मला अतिशय कठीण प्रसंगात राजकीय आधार दिला. गुरू आणि मोठे बंधू अजित पवारांनी मला आधार देत इथपर्यंत पोहोचवलं आहे, अशी भावना धनंजय मुंडेंनी (Dhananjay Munde) व्यक्त केली.

News Title – Dhananjay Munde Big Statement On Amit Shah

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील ‘या’ भागांमध्ये मुसळधार पाऊस, NDRF ची टीम तैनात

राज्यात पावसाचा धुमाकूळ! अनेक ठिकाणी शाळांना सुट्ट्या, ‘या’ भागांना आज हायअलर्ट

आज ‘या’ राशीच्या व्यक्तींच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील!

विधानसभेपूर्वीच कॉँग्रेसला झटका! ‘हा’ आमदार भाजपाच्या वाटेवर?

‘मैदानात उतरा आणि ठोकून काढा’; देवेंद्र फडणवीसांचा कार्यकर्त्यांना आदेश

 

Join WhatsApp Group

Join Now