संतोष देशमुखांच्या भावाला मोठा संशय; “आरोपींना आश्रय देणारा हा…”

On: January 4, 2025 2:43 PM
Santosh Deshmukh
---Advertisement---

Santosh Deshmukh l बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला आहे. हत्या आणि खंडणी प्रकरणी मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड याला 31 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली आहे. अशातच आज सरपंच हत्या प्रकरणात फरार असलेले आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. मात्र या दोन्ही आरोपींच्या अटकेनंतर संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

धनंजय देशमुख यांनी व्यक्त केला संशय :

सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर तब्बल 25 दिवस आरोपी फरारी होते. मात्र अखेर त्या तीन फरार आरोपींपैकी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोन आरोपींना अटक केली आहे. तसेच हे दोन आरोपी भिवंडीनंतर पुण्यात गेले असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी या दोन्ही आरोपींना पुण्यातून अटक केली आहे.

सरपंच हत्या प्रकरणात आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना अटक करण्यात आली आहे. मात्र या अटकेनंतर धनंजय देशमुख यांनी मोठा संशय व्यक्त केला आहे. कारण आज पोलिसांनी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांना पुण्यात बेड्या ठोकल्या आहेत. यावर धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे

Santosh Deshmukh l धनंजय देशमुख काय म्हणाले ? :

धनंजय देशमुख म्हणाले की, “सुदर्शन घुले व सुधीर सांगळे या दोन प्रमुख आरोपींना आज पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे मी या आधी देखील म्हणालो होतो तपास व्यवस्थित सुरू आहे. मात्र या हत्या प्रकरणातील सर्व आरोपी पुण्यातच का सापडत आहेत? तसेच त्यांना आश्रय देणारा देखील पुण्यातच असेल?” असा संशय व्यक्य केला आहे.

याशिवाय धनंजय देशमुख यांनी त्या आश्रय दात्याला देखील शोधलं पाहिजे अशी मागणी सरकारकडे केली आहे. त्यासोबत तिसरा आरोपी कृष्णा आंधळे याला सुद्धा पोलीस लवकरच शोधून काढतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

News Title : dhananjay deshmukh reaction-on two accused arrested in pune

महत्त्वाच्या बातम्या-

“यांच्या बापाचा बाप आला तरी आम्ही…”; मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?

सुदर्शन घुले अन् सुधीर सांगळेच्या मागील 10 वर्षाच्या गुन्ह्यांची यादी समोर!

घुले अन् सांगळेचा ठावठिकाणा कसा लागला?, सरपंच हत्येमागील मास्टरमाईंड दुसराच?

संतोष देशमुख हत्या प्रकरणात डॉक्टरला अटक, त्याचा नेमका रोल काय?

संतोष देशमुख हत्या प्रकरण…; अखेर सुदर्शन घुलेच्या मुसक्या आवळल्या?

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now