‘वाल्मिक कराडची दुसरी बायको…’, संतोष देशमुखांच्या भावाने केला खळबळजनक दावा

On: December 31, 2024 11:56 AM
Walmik Karad
---Advertisement---

Walmik Karad l बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे अवघा महाराष्ट्र हादरला आहे. कारण या घटनेमुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. अशातच आता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी CID अधीक्षकांची भेट घेतली आहे. यावेळी धनंजय देशमुख यांनी खंडणी प्रकरणात फरार आरोपी वाल्मिक कराडबद्दल सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे.

धनंजय देशमुख यांनी केला सर्वात मोठा दावा :

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीआयडीचे अधिकारी बीडमध्ये तळ ठोकून बसले आहेत. त्यामुळे या खून प्रकरणाच्या तपासाला गती आली आहे. अशातच सीआयडी अधीक्षकांच्या भेटीनंतर धनंजय देशमुख यांनी वाल्मिक कराड यांच्या पत्नीचा तपास सुरु असल्याची माहिती देखील दिली आहे.

मात्र त्यावेळी ज्योती जाधव यांची देखील सीआयडीकडून चौकशी सुरु होती. मात्र धनंजय देशमुख यांनी ज्योती जाधव ही वाल्मिक कराड यांची दुसरी पत्नी असल्याचा दावा केला आहे. तसेच वाल्मिक कराड सुरुवातीच्या दिवसात ज्योती जाधवकडे राहायला असल्याचा दावा केला जात आहे. मात्र आता धनंजय देशमुख यांच्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

Walmik Karad l लेकीची न्यायाची मागणी

यासोबतच सरपंच संतोष देशमुख यांच्या लेकीकडून न्यायाची मागणी केली जात आहे. ‘जे माझ्या वडिलांसोबत घडले, ते इतर कोणासोबतही घडू नये, यासाठी या घटनेतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा द्या. त्यामुळे कोणताच गुन्हेगार असे कृत्य करण्याची हिंमत सुद्धा करणार नाही.’ असं सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी हिने म्हंटल आहे.

दरम्यान, संतोष देशमुख यांची हत्या व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या संशयास्पद मृत्यूच्या निषेधार्थ सिंदखेड राजा येथे सोमवारी (30 डिसेंबरला) राष्ट्रमाता माँ जिजाऊंचे जन्मस्थळ असलेल्या राजवाड्यापासून तहसील कार्यालयापर्यंत विराट मोर्चा देखील काढण्यात आला. या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी, मुलगा विराज आणि बहिणीसह मस्साजोगमधील नातेवाइक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

News Title : Dhananjay Deshmukh Claims Jyoti Jadhav Is Walmik Karad Second Wife

महत्वाच्या बातम्या –

पुणेकरांनो 31 डिसेंबरला वाहतुकीत मोठे बदल!

पुणेकरांनो गडकिल्ले, टेकड्यांवर 31st साजरा करताय?; मग ही बातमी वाचाच

वर्षअखेरीस गुड न्यूज, सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर

वाल्मिक कराड कुठे लपून बसलाय?, सर्वात मोठी अपडेट समोर

मुंबईकरांनो थर्टी फर्स्टला दारू आणि पार्ट्या जरा जपून; अन्यथा…

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now