“संध्याकाळी मी येतो…”, विजयानंतर फडणवीसांना आला ‘त्या’ खास व्यक्तीचा फोन

On: November 23, 2024 1:47 PM
devendra fadnavis
---Advertisement---

Nagpur News | राज्यात अखेर विधानसभा निवडणूकीचा निकाल जाहीर झाला असून, महायुती पुन्हा एकदा कमबॅक केलं आहे. महाराष्ट्रात महायुतीला बहुत मिळालं असल्याचं चित्र समोर आलं आहे. त्यामुळे विजयी उमेद्वार मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करताना दिसत आहेे. समोर आलेल्या अकड्यानुसार  महायुती 216 जागांवर आघाडीवर आहे.

यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकारणात रंगल्या आहेत. नागपूरमध्ये फडणवीसांच्या अभूतपूर्व यशानंतर कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात जल्लोष पहायला मिळत आहे. याचवेळी फडणवीासांचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

फडणवीसांना कोणाचा फोन आला?

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे त्यांच्या आईसोबत फोनवर बोलत असताना दिसत आहेत. भाजप महायुतीला मिळालेल्या यशाचं कौतुक करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांची आई सरिता फडणवीस यांनी नागपूरमधून फोन केला होता.

त्यावेळी त्यांना त्यांच्या आईने शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी त्यांना नागपूरला केव्हा येतो, असंही त्यांना विचारलं. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी मी संध्याकाळी घरी नागपूरला येतो. इथे सर्व आवरतो आणि येतो, असे ते म्हणाले आहेत.

लाडक्या बहिणींमुळे विजय-

लाडक्या बहिणींनी महायुती सरकारला विजयी केल्याचे दिसून येत आहे. कारण महायुती सरकारला सर्वाधिक 216 जागांवर आतापर्यंत विजय मिळवता आला. असून पुन्हा एकदा राज्यामध्ये महायुती सरकारच येणार असं एकूण निकालावरून दिसत आहे. याशिवाय भाजपला सर्वाधिक मतं देऊन राज्यातील भाजप हा सर्वाधिक मोठा पक्ष ठरताना दिसतो आहे.

News Title : Devendra Fadnavis gets call from mother

महत्त्वाच्या बातम्या-

शरद पवारांना धक्का, कागलमधून हसन मुश्रीफ यांनी उधळला विजयी गुलाल

परळीत धनंजय मुंडेंचीच हवा; धनंजय मुंडेंच्या विजयानंतर जल्लोष

विजयाचे पोस्टर लावूनही पराभूत झालेले नेते, पाहा एका क्लिकवर

भाजपने मोडला रेकॉर्ड; ‘हा’ निर्णय ठरला महायुतीसाठी गेमचेंजर

कोकणात भाजपचा पहिला विजय, नितेश राणेंनी उधळला विजयी गुलाल

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now