Devendra Fadnavis l राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर अनेक राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे. अशातच आता सत्ता स्थापनेनंतर पालकमंत्रीपदांबाबत चढाओढ पाहायला मिळत आहे. अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पालकमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली आहे.
लवकरच पालकमंत्रीपदाचा निर्णय होणार :
महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदांसाठी भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) या तिन्ही सत्ताधारी पक्षांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. कारण पालकमंत्री पदासाठी सर्वच पक्ष दावे करत आहेत. तसेच आता सत्ताधारी पक्षांना पालकमंत्रीपदाच्या वाटपाबाबतचा लवकरच निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाला किती व कोणत्या जिल्ह्यांची पालकमंत्रीपदं मिळणार? यासंदर्भात त्या त्या पक्षातील कोणत्या आमदारांची वर्णी लागणार हे लवकरच ठरणार आहे.
अशातच आता पालकमंत्रीपदांसाठी तर्क-वितर्कांना उधाण आलं असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वत:कडे ठेवायला आवडेल असं म्हटल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
Devendra Fadnavis l पालकमंत्रीबाबत तिन्ही पक्ष मिळून निर्णय घेऊ :
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये राजकीय मुद्द्यांना त्यांनी उत्तरं दिलं आहे. मात्र यावेळी फडणवीस यांना पालकमंत्रीपदाबाबत तिन्ही पक्षांमधल्या आमदारांकडून केल्या जाणाऱ्या दाव्यांबाबत विचारणा करण्यात आली. मात्र या संदर्भात तिन्ही पक्ष मिळून निर्णय घेतील असं ते म्हणाले आहेत.
तसेच फडणवीस म्हणाले की, “माझी इच्छा अशी आहे की गडचिरोलीचं पालकमंत्रीपद माझ्याकडे ठेवावं. त्यामुळे त्याला तिन्ही नेत्यांची परवानगी दिली तर ते होईल” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत म्हंटल आहे.
News Title – devendra fadnavis claims gadchiroli guardian minister post
महत्त्वाच्या बातम्या-
सोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांची बदनामी करणाऱ्यांची खैर नाही; सरकारने उचललं मोठं पाऊल
बीडचा वणवा राज्यभर पेटणार?, सरपंच हत्येप्रकरणी विरोधकांचा एल्गार
“हप्ता वसुली सुरू असूनही…”,शिंदे गटाच्या खासदाराने केला खळबळजनक आरोप
देवेंद्र फडणवीसांचा थेट इशारा, धनंजय मुंडेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत?
संतोष देशमुखांच्या हत्येविरोधात विरोधक प्रचंड आक्रमक! घेतला सर्वात मोठा निर्णय






