‘मुख्यमंत्री होणं माझ्यासाठी..’; CM पदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा सर्वात मोठा खुलासा

On: November 15, 2024 11:22 AM
Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस
---Advertisement---

Devendra Fadnavis | विधानसभा निवडणुकीला आता काहीच दिवस शिल्लक आहेत. राज्यात यंदा महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना होणार आहे. त्यामुळे कोणत्या आघाडीला सर्वाधिक जागा मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. त्यातच आतापासूनच विविध राजकीय नेत्यांकडून विधानसभेत कुणाला किती जागा मिळणार, याबाबतही दावे केले जात आहेत. अशात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं एक विधान चर्चेत आलंय. (Devendra Fadnavis)

फडणवीस यांनी महायुतीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार, याचा खुलासा केलाय. त्यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. यामध्ये फडणवीस यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. राज्यात 2019 मध्ये आमच्या 105 जागा आल्या होत्या. मात्र, या निवडणुकीत त्यापेक्षाही अधिक जागा आम्हाला मिळतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केलाय.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

तसेच, जागावाटप कसं ठरलं गेलं याबाबतही त्यांनी खुलासा केला. एकनाथ शिंदे हे जवळपास अडीच वर्षे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी त्यांची ताकद निर्माण केली. अजित पवार युतीत एक वर्षे उशिराने आले. एकनाथ शिंदे यांच्याकडे पुरेसा वेळ होता. त्यांनी त्यांची ताकद एकवटत विस्ताराकडेही लक्ष दिले. तर, अजित पवारांना शरद पवार यांच्यासारख्या तगडया नेत्यासोबत लढा द्यायचा असल्याने त्यांची सर्व ताकद प्रयत्नपूर्वक एकवटायची होती.त्यामुळे शिंदे यांना जास्त जागा दिल्या, असं फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

मुलाखतीमध्ये तुम्हाला वैयक्तिकरित्या मुख्यमंत्रिपदाची इच्छा नाही का?, असा सवाल फडणवीस यांना करण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले की, लोकसभेत मी राज्याचे नेतृत्व करत होतो. त्यात आम्हाला अपयश आले.मात्र, तरीही पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवत विधानसभा निवडणुकांची जबाबदारी टाकली. माझ्यासाठी हे पुरेसे आहे. आता मुख्यमंत्री होणे हे सर्व माझ्यासाठी गौण आहे, असं फडणवीस म्हणाले.

“भाजपचा मुख्यमंत्री व्हावा, अशी इच्छा..”

कार्यकर्त्यांची भाजपचा मुख्यमंत्री व्हावा, अशी भावना आहे. पण वस्तुस्थिती पहायची असते. आघाडी वा महायुतीचे राजकारण हे वास्तवावर आधारित असते. घटक पक्षांना सोबत घेऊन जायचे असताना आमच्या सर्व आकांक्षा पूर्ण होतीलच, असे नाही. त्यामुळे या शर्यतीत तरी मी नाही, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.

तसेच मुख्यमंत्री पदासाठी जास्त जागा, स्ट्राइक रेट असे कोणतेही निकष ठरलेले नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे, अजित पवार व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असे तिन्ही पक्षाचे प्रमुख एकत्र बसतील. तसेच, भाजपची संसदीय समिती ज्यांना अधिकार देतील ते या बैठकीत बसून निर्णय घेतील, असंही फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

News Title –  Devendra Fadnavis big statement on CM post

महत्त्वाच्या बातम्या-

राज्यात महाविकास आघाडीला बहुमत मिळणार?, आणखी एक सर्व्हे समोर

शाळकरी विद्यार्थ्यांना या महिन्यात सलग 4 दिवस सुट्ट्या मिळणार, कारण..

खरेदीची करा घाई! सोनं झालं स्वस्त, सराफा बाजारात काय आहेत सध्या किंमती?

दिशा सालियन प्रकरणी पुन्हा चौकशी लावणार, ‘या’ नेत्याचा आदित्य ठाकरेंना इशारा

आज कार्तिक पौर्णिमेला ‘या’ राशींवर राहणार विष्णुदेव व लक्ष्मीची कृपा!

Join WhatsApp Group

Join Now