Devendra fadnavis | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल अमरावती येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. तसंच उद्धव ठाकरे यांच्या टीकेला देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं. काल शिवसेनेच्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis ) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यांच्या टीकेला फडणवीस यांनीही जशास तसं उत्तर दिलं.यावेळी त्यांनी अमरावती येथे भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या पराभवाबाबतही भाष्य केलं.
“विरोधी गटातील लोक सत्तेत आल्यावर फक्त पैसे गोळा करतात. पण, सत्ता गेली की त्यांना गरीब, शेतकरी, कष्टकरी आठवतो. तुम्ही गेली 60-70 वर्ष राज्यात सत्ता उपभोगली, यावेळी तुम्हाला शेतकरी, कष्टकरी का आठवला नाही? तुम्हाला एससी, एसटी समाज का आठवले नाहीत? सत्तेवरून गेले की या सर्वांची आठवण होते आणि सत्तेवर हे लोक आले की तोंड मिटून ते गप्प बसतात”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
पुढे त्यांनी अमरावतीत नवनीत राणा यांच्या पराभवाबद्दलही वक्तव्य केलं. “नवनीत ताई, तुम्ही पडल्याचं दु:ख सर्वांना झालं. पण काही लोकांना फार आनंद झाला. राजकमल चौकात त्यांनी काय केलं ते सगळ्यांनीच पाहिलं आहे.अरे वेड्यांनो आता जागे झाला नाहीत ना, तर तुम्हाला बाहेर फिरता येणार नाही. हे जर सहन करत राहिलात तर आपल्या आई-बहिणींना फिरणं मुश्किल होईल.”, असं फडणवीस(Devendra fadnavis ) म्हणाले आहेत.त्यांचं हे विधान आता चर्चेत आलं आहे.
दरम्यान, यावेळी फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला. “ज्यांनी जाज्वल्य हिंदुत्व सांगितलं ते हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांना जेव्हा हिरव्या झेंड्याच्या तालावर नाचताना पाहिलं तेव्हा मला मनापासून दुःख झालं. आता या ठिकाणी कुणाकडून अपेक्षा करावी?”, असा खोचक टोला फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?
“दोनच दिवसांअगोदर मी म्हणालो होतो की, एक तर तू राहशील किंवा मी राहिल. माझ्या पायाशी कलिंगड ठेवलेलं होतं. त्यामुळे काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं. पण,मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही”, असं म्हणत नाव न घेता उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis ) यांच्यावर टीका केली होती.
News Title – Devendra fadnavis Big Statement
महत्त्वाच्या बातम्या-
ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद! सोनं झालं स्वस्त, 10 ग्रॅमसाठी आता..
सतर्क! राज्यात आज अतिवृष्टीचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी
“कंगना राणौतचा चेहरा पाहिला तर पाप..”; शंकराचार्य यांचं वक्तव्य चर्चेत
आज ‘या’ राशी होतील धनवान; गुंतवणुकीतून मिळेल बक्कळ पैसा
“खड्ड्यांचं पुणं झालंय, त्यांना खड्डापुरुष पुरस्कार द्या”; उद्धव ठाकरे गडकरींवर बरसले






