कोथरूडचा सर्वांगीण विकास हाच एकमेव ध्यास- चंद्रकांत पाटील

On: November 8, 2024 11:42 AM
Chandrakant Patil
---Advertisement---

Pune | कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हाच ध्यास असून, गेल्या पाच वर्षांपासून कोथरुड हे कुटुंब मानून कार्यरत आहे, भविष्यातही कोथरुडसाठी समर्पित होऊन काम करणार; असल्याची भावना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी व्यक्त केली. कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांना वाढते जनसमर्थन मिळत आहे.

भाजपा कोथरूड दक्षिण मंडळाच्या वतीने आज प्रभाग क्रमांक 10 मध्ये बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रॅलीमध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे देखील सहभागी झाले होते.

चंद्रकांत पाटलांची रॅली

कोथरूड मधील किनारा हॉटेल चौक येथून रॉलीचा शुभारंभ झाला. परमहंसनगर, टेकडी पायथा, कस्तुरी हॉटेल चौक, पौड रोड, कोथरूड पोलीस स्टेशन, श्रीराम कॉलनी, आशिष गार्डन, कुमार परिसर, सागर कॉलनी, कैलास वसाहत, साईनाथ वसाहत, पीएमसी कॉलनी, अरमान सोसायटी, भिमाले टॉवर्स, सिद्धिविनायक गणेश मंदिर येथे रॉलीचा समारोप झाला.

रस्त्याच्या दुतर्फा उभं राहून लोक हात उंचावून पाठिंबा दर्शवीत होते. फटाक्यांची आतषबाजी, पुष्पवृष्टी यांसह अनेक ठिकाणी महिला औक्षण करण्यासाठी पुढं येत होत्या. विशेष म्हणजे तरुणांचा जल्लोष आणि घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.

यावेळी भाजप दक्षिण मंडल अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे आशिष शिंदे, रिपाइंचे ॲड. मंदार जोशी,  नगरसेवक दिलीप वेडे पाटील, नगरसेविका अल्पना वर्पे, डॉ. श्रद्धा प्रभूणे-पाठक, बाळासाहेब टेमकर, वैभव मुरकुटे, गणेश वर्पे, कैलास मोहोळ, बाळासाहेब खंकाळ, राजेश गायकवाड, सिताराम खाडे यांच्या सह महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

HDFC बँकेने ग्राहकांना दिला झटका! ग्राहकांचे EMI ‘इतक्या’ रुपयांनी वाढणार

मनसेसह शिंदे गटाला उद्धव ठाकरेंचा धक्का; तब्बल ‘इतक्या’ नेत्यांनी बांधलं शिवबंधन

सोन्याने दिली आनंदवार्ता! लग्न सराईपूर्वीच उतरले भाव; जाणून घ्या आजचे दर

“…नाहीतर ‘त्याला’ एक महिन्यात संपवू”; सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी

“राजसाहेब तुम्हाला बडव्यांनी घेरलंय, वेळीच सावध व्हा..”; ‘या’ नेत्याचं ट्वीट चर्चेत

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now