RCB च्या चाहत्यांसाठी धक्का! स्टार खेळाडू दुखापतीमुळे IPL 2025 मधून बाहेर

On: May 8, 2025 4:18 PM
RCB Ban
---Advertisement---

RCB | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघ सध्या आयपीएल 2025 मध्ये जोरदार कामगिरी करत आहे. 11 पैकी 8 सामने जिंकून संघ प्लेऑफच्या अगदी उंबरठ्यावर पोहोचला आहे. मात्र या विजयी मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार फलंदाज देवदत्त पडिक्कल दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे.

देवदत्त पडिक्कलने (Devdatta Padikkal) यंदाच्या हंगामात 10 सामन्यांत 247 धावा करत संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याच्या आक्रमक शैलीच्या फलंदाजीमुळे RCB ला अनेक सामन्यांमध्ये सुरुवातीपासूनच चांगली गती मिळाली होती. मात्र दुखापतीमुळे त्याची अनुपस्थिती संघासाठी चिंता निर्माण करणारी आहे.

मयंक अग्रवालला संधी, आणखी एक जखमी खेळाडू :

पडिक्कलच्या जागी आता अनुभवी मयंक अग्रवालला (Mayank Agrwal) संघात संधी देण्यात आली आहे. मयंक याआधी RCB संघाकडून खेळलेला आहे, मात्र यंदाच्या लिलावात त्याला खरेदी करण्यात आले नव्हते. आता ही संधी त्याच्यासाठी पुनरागमन करण्याची आणि आपली क्षमता पुन्हा सिद्ध करण्याची आहे.

दरम्यान, संघासाठी आणखी एक चिंता म्हणजे वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड देखील जखमी झाला आहे. तो लवकरच तंदुरुस्त होईल अशी आशा संघ व्यवस्थापनाने व्यक्त केली आहे. सध्या RCB पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी केवळ एक विजय आवश्यक आहे.

RCB | प्लेऑफपूर्वी आरसीबीला डबल धक्का :

एकीकडे पडिक्कल आणि दुसरीकडे हेझलवूडच्या अनुपस्थितीमुळे RCB च्या अंतिम टप्प्यातील रणनीतीवर परिणाम होऊ शकतो. तरीही संघातील अन्य खेळाडूंनी दमदार कामगिरी करत या धक्क्यांवर मात करण्याची तयारी दाखवली आहे.

संघ व्यवस्थापनाने चाहत्यांना आश्वस्त केले आहे की संघ सर्वोत्तम संयोजनासह उर्वरित सामने खेळणार असून, अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्याचा निर्धार कायम आहे.

News Title: Big Blow to RCB: Devdutt Padikkal Ruled Out of IPL 2025 Due to Injury, Mayank Agarwal Joins Squad

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now