विजयानंतरही हार्दिक पांड्या नाराज; म्हणाला, “आम्ही ते करू शकलो नाही”

On: May 2, 2025 3:04 PM
Hardik Pandya Unhappy
---Advertisement---

Hardik Pandya Unhappy | आयपीएल 2025 (IPL 2025) मध्ये दमदार पुनरागमन करणाऱ्या मुंबई इंडियन्स (MI) संघाने राजस्थान रॉयल्सविरुद्ध 100 धावांनी दणदणीत विजय मिळवला. हा संघाचा सलग सहावा विजय असून, आता ते पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहेत. मात्र या मोठ्या विजयानंतरही कर्णधार हार्दिक पांड्या नाराजी व्यक्त करताना दिसला.

“१५ धावा कमी केल्या!” :

राजस्थानविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने (MI) २ गडी गमावून २१७ धावा केल्या. विजयाचे श्रेय संघाच्या फलंदाजी व गोलंदाजीला दिलं जात असताना हार्दिक म्हणाला, “आम्ही चांगली फलंदाजी केली, गोलंदाजीही उत्तम होती. पण तरीही आम्ही किमान १५ धावा कमी केल्या. त्या मिळवता आल्या असत्या.”

त्याने पुढे सांगितले की, “मी आणि सूर्यकुमार यादव (Surykumar yadav) फलंदाजी करत असताना आम्ही सतत एकमेकांशी बोलत होतो की, क्रिकेटिंग शॉट्स खेळायचे. गॅपमध्ये शॉट मारल्यास चौकार सहज मिळतो. रोहित आणि रायननेही सुरुवात उत्तम केली, त्यामुळे अजून धावा होऊ शकल्या असत्या.”

Hardik Pandya Unhappy | गोलंदाजांकडे आत्मविश्वास :

मुंबईने राजस्थानचा डाव केवळ ११७ धावांत गुंडाळला. यासाठी हार्दिकने गोलंदाजांचंही कौतुक केलं. तो म्हणाला, “आमच्याकडे अनुभवी गोलंदाजी आक्रमण आहे. त्यामुळे मला फार काळजी वाटत नाही. आम्ही गोष्टी सोप्या ठेवतो, आणि त्याचा संघाला फायदा होतो.”

मुंबई इंडियन्सने पहिल्या ५ पैकी ४ सामने गमावले होते. मात्र आता सलग सहा विजय मिळवत त्यांनी जोरदार पुनरागमन केलं आहे. पुढील सामना ६ मे रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध होणार आहे.

News Title: Despite Big Win vs RR, Hardik Pandya Unhappy: “We Fell 15 Runs Short”

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now