Delhi Vehicle Rules | राजधानी दिल्लीतील (Delhi) वाहन मालकांसाठी रेखा गुप्ता (Rekha Gupta) सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. १० वर्षे जुन्या डिझेल आणि १५ वर्षे जुन्या पेट्रोल गाड्या आता भंगारात काढण्याची सक्ती नसणार आहे. सरकारने नियमात बदल केल्यामुळे या गाड्यांना दिल्ली (Delhi) परिवहन विभागाकडून एनओसी (NOC) घेऊन दुसऱ्या राज्यांमध्ये पुन्हा नोंदणी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
एनओसीसाठी वेळेची अट रद्द :
दिल्ली (Delhi) परिवहन विभागाच्या पूर्वीच्या नियमांनुसार, वाहनाची नोंदणी संपल्यानंतर केवळ एका वर्षाच्या आतच एनओसी (NOC) मिळवणे शक्य होते. जर १० वर्षांची डिझेल (Diesel) किंवा १५ वर्षांची पेट्रोल (Petrol) गाडी जुनी झाली असेल, तर वर्षभरात एनओसी (NOC) न घेतल्यास ती भंगारात (Scrap) काढावी लागत होती.
मात्र, आता सरकारने हा जुना नियम बदलला असून, एनओसी (NOC) घेण्यासाठीची एक वर्षाची कालमर्यादा पूर्णपणे रद्द केली आहे. या नवीन निर्णयामुळे, गाडीची नोंदणी संपून अनेक वर्षे झाली असली तरी, वाहन मालक कधीही एनओसीसाठी (NOC) अर्ज करू शकतात. यामुळे वाहन मालकांना आर्थिक नुकसानीपासून दिलासा मिळेल.
Delhi Vehicle Rules | प्रदूषणावर नियंत्रण: १ नोव्हेंबरपासून नवा नियम :
जुन्या वाहनांना दिलासा देत असतानाच, दिल्ली (Delhi) सरकारने प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर पाऊल उचलले आहे. एअर क्वालिटी मॅनेजमेंट कमिशनच्या (CAQM) (Air Quality Management Commission) आदेशानुसार, १ नोव्हेंबर २०२५ पासून दिल्लीच्या (Delhi) सीमेत प्रवेश करणाऱ्या बाहेरील राज्यांच्या व्यावसायिक वाहनांसाठी (Commercial Vehicles) नवीन नियम लागू होईल.
या नियमानुसार, ज्या व्यावसायिक वाहनांकडे बीएस-६ (BS-VI) मानांकन नाही, अशा जुन्या वाहनांना दिल्लीत (Delhi) पूर्णपणे प्रवेशबंदी असेल. हा निर्णय विशेषतः हिवाळ्यातील धोकादायक प्रदूषण पातळी रोखण्यासाठी घेण्यात आला आहे. दिल्ली (Delhi) परिवहन विभागाने (Delhi Transport Department) याबाबत सार्वजनिक सूचना जारी केली असून, लोकांना एसएमएस (SMS) द्वारेही याची माहिती दिली जात आहे.






