Deepika Padukone | बाॅलिवूडमधील सर्वाेत्कृष्ट जोडप्यांपैकी दीपिका आणि रणवीर सिंग यांची एक जोडी आहे. ऑनस्क्रिन असो किंवा ऑफस्क्रिन त्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. दोघेही सतत चर्चेत असतात. काही दिवासांपूर्वी दीपिका आणि रणवीरने आई बाबा होणार असल्याचं सांगितलं होतं. सप्टेंबरमध्ये चाहत्यांना गुडन्यूज देणार आहे अशी पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलं होतं. दरम्यान, आज (08) स्पटेंबर रोजी बाळाला जन्म दिला आहे.
दीपिका झाली आई-
दीपिका पादुकोणने चाहत्यांना ‘गुड न्यूज’ दिली आहे. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज (8 सप्टेंबर) दीपिकाने मुलीला जन्म दिला आहे. डिलिव्हरीच्या दोन दिवस आधी दीपिका आणि रणवीर हे मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गेले होते. गणरायाचा आशीर्वाद घेतल्यानंतर शनिवारी दीपिकाला मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आज रविवारी दीपिकाने चाहत्यांना गोड बातमी दिली आहे.
अनंत-राधीकाच्या लग्नात एकत्र-
आपल्या चाहत्यांसाठी दोघे सुद्धा आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन नवनवीन फोटो शेअर करत असतात. दीपिका (Deepika Padukone) आणि रणवीरची फॅन फॉलोइंग सुद्धा वाढताना दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी रणवीर आणि दीपिका या दोघांनी देखील अनंत- राधीकाच्या लग्नात हजेरी लावली होती.
News Title : Deepika Padukone became mother
महत्त्वाच्या बातम्या-
गणपती बाप्पाला ‘या’ राशीचे लोक फार प्रिय असतात!
आयफोन 16 ‘या’ देशात मिळणार सर्वात स्वस्त!
घरी गणपती बाप्पाची स्थापना करत असाल तर ‘या’ वस्तू घरात चुकूनही आणू नका!
गणेशोत्सवाला गालबोट! मंडळाचे बॅनर लावणाऱ्या दोघांना BMW कारने चिरडलं
पुण्यातील ‘या’ भागात 10 दिवस दारू बंदी!…तर असं केल्यास कारवाई होणार






