शिंदे गटाला मोठं खिंडार, तब्बल ‘इतक्या’ नेत्यांचा उद्धव ठाकरे गटात प्रवेश

On: October 7, 2024 9:30 AM
Deepesh Mhatre join Uddhav Thackeray Group
---Advertisement---

Uddhav Thackeray Group | राज्यात विधानसभा निवडणुका लवकरच होणार आहेत. मात्र, त्यापूर्वीच अनेक पक्षात इनकमिंग आऊटगोईंग सुरु असल्याचं चित्र दिसून येतंय. अशात डोंबिवलीमध्ये शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाच्या काही नेत्यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केलाय. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. (Uddhav Thackeray Group)

शिंदे गटाचे युवा सेना सचिव दिपेश म्हात्रे यांनी सात नगरसेवक आणि शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलाय. यामुळे मोठे शक्तीप्रदर्शन देखील करण्यात आले. शिंदे गटासाठी हा मोठा फटका मनाला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री रविंद्र चव्हाण आणि दिपेश म्हात्रे यांच्यातील वाद चव्हाट्यावर आले होते. अशात दिपेश म्हात्रे यांनी शिंदे गटाला थेट रामराम ठोकला आहे.

डोंबिवलीत शिंदे गटाला मोठं खिंडार

शिंदे गटाचे प्रदेश सचिव दिपेश म्हात्रे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेना ठाकरे गटात जाहीर प्रवेश केलाय. दिपेश म्हात्रेंसोबतच त्यांचे बंधू, माजी नगरसेवक जयेश म्हात्रे, रुपेश म्हात्रे, रत्नाताई म्हात्रे, सुलोचना म्हात्रे, संगीता भोईर, वसंत भगत, संपत्तीताई शेलार अशा सात माजी नगरसेवकांनी देखील उद्धव ठाकरे गटात प्रवेश केलाय. (Uddhav Thackeray Group)

दिपेश म्हात्रे यांनी उद्धव ठाकरे गटात जाण्यापूर्वी चांगलंच शक्तीप्रदर्शन केलं. हाती घेऊन मशाल, घडवू महाराष्ट्र खुशाल अशा आशयाचे बॅनर डोंबिवलीमध्ये दिसून आले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांचे स्वागत केले. तुम्ही परत आला याचा आनंद आहे. थोडा आधी निर्णय घेतला असता तर ही गुंडगिरी, जुलूमशाही लोकसभेतच गाडून टाकली असती, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“..फक्त यांनाच पक्षात परत घेणार”

“तुम्ही ज्याच्या आहारी गेला होतात ते हिंदुत्व, ती शिवसेना आणि ते विचार बाळासाहेबांचे नाही हे तुमच्याही लक्षात आलंय. महाराष्ट्र विकणे हा बाळासाहेबांचा विचार कधीच नव्हता आणि कधीच असूही शकत नाही. तोच विचार घेऊन मी शिवसेना पुढे नेतोय.”, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. (Uddhav Thackeray Group)

यावेळी त्यांनी पुन्हा कुणाला सोबत घेणार याबाबतही भाष्य केलं. गद्दारांनी आपलं सरकार पाडलं, शिवसेना संपवायला निघाले आहेत त्यांना कोणत्याही परिस्थितीत घेणार नाही, तिकडे बसलेत त्यांना उमेदवारी देणार नाही. तुमच्यासारखे अनेक कार्यकर्ते धाकदपटशाह असेल, दिशाभूल झाली असेल म्हणून तिकडे गेले असतील त्यांना परत घेणार, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सांगितलं.

News Title- Deepesh Mhatre join Uddhav Thackeray Group

महत्वाच्या बातम्या-

ऐन दिवाळीत शनीची वक्री चाल, ‘या’ 3 राशींचे सुरू होणार अच्छे दिन!

‘बिग बॉस’चा विजेता सुरज चव्हाणला बक्षीस म्हणून मिळाला 14 लाखांचा चेक अन्ं बरंच काही

आज नवरात्रीचा पाचवा दिवस, देवी स्कंदमाता ‘या’ राशींवर करणार सुखाचा वर्षाव!

निक्की तांबोळीच्या आयुष्याबद्दल आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा!

मोदींचं मंदिर बांधणाऱ्या नेत्याचा भाजपला रामराम, गंभीर आरोपांनी एकच खळबळ

Join WhatsApp Group

Join Now