अजितदादांना मोठा धक्का! ‘या’ दिग्गज नेत्यानी सोडली साथ

On: October 15, 2024 3:35 PM
Ajit Pawar
---Advertisement---

Ajit Pawar l महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय नेते आपलं पारडं जड करण्याच्या तयारीत आहे. अशातच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

दिग्गज नेत्यानी अजितदादांची साथ सोडली :

राज्यातील विधानसभा निवडणूक जवळ येताच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेतेमंडळी अजित पवारांना रामराम करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून तुतारी हाती घेत असल्याचं दिसत आहे. काही दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्याच्या फलटण मतदारसंघातील अजित पवार गटातील आमदार राजराजे नाईक निबांळकर यांचे बंधू संजीव निंबाळकर व आमदार दीपक चव्हाण यांनी अजित पवारांची साथ सोडत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

अशातच आज सोलापूर जिल्ह्यातील एका दिग्गज नेत्यानी अजित दादांची साथ सोडली आहे. कारण दीपक साळुंके यांनी अजित पवारांना रामराम ठोकला आहे. दीपक साळुंके यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील सर्वच पदांचा राजीनामा दिला आहे.

Ajit Pawar l शरद पवार गटात प्रवेश करणार? :

दीपक साळुंके यांनी राजीनामा देऊन विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली आहे. दीपक साळुंखे यांच्याकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी होती. महायुतीमध्ये विद्यमान आमदार ज्या पक्षाचा आहे, त्या पक्षालाच ती जागा देण्याचा निर्णय झाला आहे.

मात्र त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सांगोल विधानसभेची जागा ही विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील यांच्याकडे असल्याने सांगोल विधानसभेची जागा ही शिवसेना शिंदे गटाला जाणार आहे. त्यामुळे दीपक साळुंके यांनी अजित पवार गटातून बाहेर पडले आहेत. त्यानंतर त्यांनी शरद पवार गटात जाऊन तुतारी हाती घेणार असल्याचं बोललं जात आहे.

News Title : Deepak salunkhe left ajit pawar group

महत्वाच्या बातम्या-

‘या स्टेप्स फॉलो करा अन् घरबसल्या तपासा मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही?

लाडक्या बहिणींना मिळणार 5500 रुपयांचा दिवाळी बोनस; या 3 अटी लागू

राज्यात कोणत्या पक्षाचं किती संख्याबळ?, वाचा सर्व माहिती एका क्लिकवर

बोपदेव घाटातील प्रकरण ताजं असतानाच पुण्यात घडली आणखी एक धक्कादायक घटना!

आचारसंहिता म्हणजे काय? ‘या’ दरम्यान कोणत्या गोष्टींवर बंदी असते?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now