मशाल घेऊन चटके द्या; अजित पवारांना मोठा धक्का!

On: October 19, 2024 1:48 PM
Ajit Pawar
---Advertisement---

Ajit Pawar l महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक उलाढाली होत आहेत. अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवारांना एक मोठा धक्का बसला आहे. अजित पवार राष्ट्रवादी गटाचे माजी जिल्हाध्यक्ष दीपक साळुंके यांनी मुंबईत उध्दव ठाकरे शिवसेना गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

अजित पवार गटाला मोठा धक्का :

दीपक साळुंके यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासह पक्षातील नेतेमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अजित पवारांच्या शिलेदाराने मशाल हातात घेतल्याने महायुतीचे चांगलेच टेन्शन वाढले आहे.

याशिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून सांगोला विधानसभेसाठी दीपक साळुंके यांची उमेदवारी देखील घोषित करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पक्ष सोहळ्याच्या याप्रसंगी शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांच्यावर देखील टिकेच्या तोफा डागत दीपक साळुंके यांच्या पक्षप्रवेशाचं स्वागत केलं आहे.

Ajit Pawar l मशाल घेऊन चटके द्या :

यावेळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक भाकीत केलं आहे. सांगोल्यात गद्दारांच्या छाताडावर पाय रोवून मशाल विजयी होणार असे ते म्हणाले आहेत. तसेच संजय राऊत पुढे म्हणाले की, ”ज्या एका गद्दाराला महाराष्ट्रातील झाडी डोंगर दिसले नाही आणि दुसऱ्या राज्यातलं झाडे डोंगर दिसले. मात्र आता त्या झाडाच्या मुळाखाली त्याला गाडायचे आहे”, असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले आहेत.

याशिवाय आबा आता तुमच्या हातात मशाल दिलेली आहे. मग आता ही मशाल कशी पेटवायची आणि नेमके कोणाला चटके द्यायचे, हे तुम्ही ठरवायचे असे बोलून सांगोल्यातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून दीपक आबांना उमेदवारी जाहीर होण्याची दाट शक्यता असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

News Title – Sangola Assembly Constituency Deepak Aba Salunkhe Joins Thackeray Group

महत्त्वाच्या बातम्या-

शरद पवार गटाची संभाव्य उमदेवार यादी समोर! पाहा संपूर्ण यादी

लाडक्या बहीणींनो सरकारने थांबवला योजनेचा हप्ता; आता दिवाळीत पैसे मिळणार की नाही?

ठाकरेंचे उमेदवार ठरले! कोणत्या मतदारसंघातून कोण लढणार?

दिवाळीपूर्वीच सोनं 80 हजारांवर?, जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर

शुक्र आणि शनीची युती ‘या’ 3 राशींना करणार धनवान, डिसेंबर महिना ठरणार भाग्याचा!

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now