‘या’ आठवड्यात ‘इतक्या’ दिवस बँका बंद राहणार, पाहा सुट्ट्यांची यादी

On: December 23, 2024 11:30 AM
December Bank Holiday 2024
---Advertisement---

December Bank Holiday 2024 l डिसेंबर महिना संपायला अवघे सात दिवस उरले आहेत. त्यामुळे तुमचे बँकेशी निगडित काही काम राहिले असेल तर तुम्हाला ते त्वरित करावे लागणार आहे. कारण या आठवड्यात तब्ब्ल तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे तुम्ही सुट्ट्या पाहून बँकेच्या कामाचं नियोजन करायला हवं.

तीन दिवस बँका बंद राहणार! :

या आठवड्यात तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. 25 डिसेंबर रोजी ख्रिसमस निमित्ताने देशभरातील बँका देखील बंद राहणार आहेत. याशिवाय 28 डिसेंबर रोजी चौथा शनिवार आणि 29 डिसेंबर रोजी रविवार असल्याने या दोन दिवशी बँका बंद राहणार आहेत.

मात्र या आठवड्यात तीन दिवस बँका बंद असल्या तरी देखील तुम्ही ऑनलाईन स्वरूपाने बँकेची कामे करू शकता. त्यामुळे तुम्ही पैसे ट्रान्सफर करणं, बिल भरणं, रिचार्ज करणं, पैसे गुंतवण्यासारख्या गोष्टी बँकेच्या अधिकृत अॅपच्या मदतीनं करू शकता.

December Bank Holiday 2024 l डिसेंबर महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी पुढीलप्रमाणे :

24 डिसेंबर (मंगळवार): ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला कोहिमा, आयझॉलमध्ये बँका बंद राहणार आहेत.

25 डिसेंबर (बुधवार): नाताळ निमित्त सर्व राज्यांमध्ये बँका बंद राहणार.

26 डिसेंबर (गुरुवार): नाताळ या सणानिमित्त काही राज्यांमध्ये बँका बंद राहणार.

27 डिसेंबर (शुक्रवार): नाताळ या सणानिमित्त काही राज्यांमध्ये बँका बंद राहणार.

28 डिसेंबर (शनिवार): चौथा शनिवार

29 डिसेंबर (रविवार): साप्ताहिक सुट्टी

30 डिसेंबर (सोमवार): शिलाँगमध्ये यू कियांग नंगबहामुळे बँका बंद राहणार आहेत.

31 डिसेंबर (मंगळवार): नवीन वर्षाची पूर्वसंध्या (काही राज्यांमध्ये स्थानिक सुट्टीमुळे बँका बंद राहणार आहेत.)

News Title : December Bank Holiday 2024

महत्वाच्या बातम्या –

अल्लू अर्जुनच्या घराच्या मोडतोडप्रकरणी वडिलांनी दिली पहिली प्रतिक्रिया!

महिलांची संक्रांत गोड होणार, जानेवारीतच मिळणार लाडकी बहीण योजनेचे पैसे?

“महात्मा गांधी पाकिस्तानचे राष्ट्रपिता, ते चुकून भारताचे…”; प्रसिद्ध गायकाचं वादग्रस्त वक्तव्य

महाराष्ट्रातील राजकारण तापणार?; राहूल गांधी आज परभणीत, सूर्यवंशी कुटुंबाला भेटणार

छगन भुजबळांची पुढील भूमिका ठरली?, शरद पवारांचं कौतुक करत म्हणाले…

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now