Rahul Gandhi | काही दिवसांपूर्वी अमेरिकेत कॉँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी शीखांबाबत एक वक्तव्य केलं होतं. यामुळे शीख बांधवांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अशात कॉँग्रेसने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत एक धक्कादायक आरोप केला आहे. राहुल गांधींच्या (Rahul Gandhi ) वक्तव्याचा निषेध म्हणून काल 11 सप्टेंबररोजी दिल्लीत सोनिया गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर शिखांनी निदर्शने केली.
या निदर्शनादरम्यान भाजप नेते तरविंदर सिंग मारवाह यांनी राहुल गांधींना उघडपणे धमकी दिल्याचा आरोप कॉँग्रेसने केला आहे. या धमकीचा व्हिडिओ शेअर करत कॉँग्रेसने कारवाईची मागणी केली आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
राहुल गांधी यांनी अमेरिकेत शिखांचा उल्लेख करताना भारतातील धार्मिक स्वातंत्र्यावर भाष्य केलं. त्यावर शीख समुदायाने आक्षेप घेत दिल्लीत निदर्शने केली. यावेळी जनपथ रोडवरील पोलिसांचे बॅरिकेड्स तोडण्याचेही प्रयत्न झाले.अशात राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
भाजप नेत्याची राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी?
“राहुल गांधी वेळीच सावध व्हा. नाहीतर येत्या काळात तुमचीसुद्धा आजीसारखीच गत होईल.”,अशी धमकी भाजपचे माजी आमदार तरविंदर सिंग मारवाह यांनी काल निदर्शनादरम्यान दिली. हा व्हिडीओ काँग्रेसने आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ही पोस्ट टॅग करून कारवाईची मागणी देखील करण्यात आली आहे. (Rahul Gandhi )
“भाजपचा हा नेता उघडपणे विरोधी पक्षनेत्याला जीवे मारण्याची धमकी देत आहे, नरेंद्र मोदीजी, तुमच्या पक्षाच्या या नेत्याच्या धमकीवर तुम्ही गप्प बसू शकत नाही”, अशी पोस्ट कॉँग्रेसने केली आहे. ही पोस्ट आता व्हायरल होत आहे. हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. तुमच्या पक्षाच्या द्वेषाच्या फॅक्टरीचं हे प्रॉडक्ट आहे. या विरोधात कारवाई झालीच पाहिजे, असंही या पोस्टमध्ये म्हटलंय.(Rahul Gandhi )
दिल्ली BJP का नेता और पूर्व विधायक, तरविंदर सिंह मारवाह ने आज प्रदर्शन के दौरान कहा:
“राहुल गांधी बाज आ जा, नहीं तो आने वाले टाइम में तेरा भी वही हाल होगा जो तेरी दादी का हुआ”
BJP का ये नेता खुलेआम देश के नेता प्रतिपक्ष की हत्या की धमकी दे रहा है.@narendramodi जी, अपने… pic.twitter.com/tGisA5dfNu
— Congress (@INCIndia) September 11, 2024
राहुल गांधी नेमकं काय म्हणाले होते?
“एका शीख व्यक्तीने भारतात पगडी अथवा कडे घालावे की नाही. एक शीख म्हणून ती व्यक्ती गुरुद्वारात जाऊ शकते की नाही. यासाठी लढाई आहे आणि ही केवळ त्यांच्यासाठीच नाही तर सर्व धर्मांसाठी आहे.”, असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं होतं. (Rahul Gandhi )
News Title – Death threat to Rahul Gandhi
महत्त्वाच्या बातम्या-
ऐन सणा सुदीच्या मुहूर्तावर सोनं महागलं, जाणून घ्या आजचे दर
राज्यात ‘या’ भागांवर गडद ढगांची चादर, पुढील दोन दिवस धो-धो बरसणार!
आज गौरी विसर्जनाच्या दिवशी ‘या’ 5 राशींना देवी करणार धनवान!
‘या’ राशींनी आज सावध राहावे, तुमच्या हळव्या स्वभावाचा फायदा घेतला जाऊ शकतो!






