खळबळजनक! एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी

On: January 6, 2025 11:53 AM
Eknath Shinde
---Advertisement---

Eknath Shinde l एका तरुणाने इन्स्टाग्रामवर लाईव्ह स्ट्रिमिंग करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक :

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, एका तरुणाने इन्स्टाग्रामवर लाईव्ह स्ट्रिमिंग करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. त्यानंतर या धमकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यानंतर धमकी देणाऱ्या तरुणावर कारवाई करण्याची मागणी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

याप्रकरणी ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांकडून धमकी देणाऱ्या तरुणाचा शोध सुरु आहे. हितेश धेंडे असं धमकी देणाऱ्या 24 वर्षीय तरुणाचं नाव आहे. हितेश हा ठाण्यातील वरळी पाडा परिसरातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Eknath Shinde l पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु :

दरम्यान, हितेश या आरोपीनं इन्स्टाग्रामवर एकनाथ शिंदे यांना धमकी दिली, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबाबद्दल अपशब्दांचा वापर केला आहे. तसेच एकनाथ शिंदे यांना गोळ्या घालून ठार मारू अशी धमकी आरोपीनं दिली आहे.

याप्रकरणी श्रीनगर पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकं देखील रवाना केली आहेत. मुंबईसह विविध ठिकाणी आता आरोपीचा शोध घेतला जात आहे. मात्र आरोपीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नेमकी धमकी कशामुळे दिली? यामागचं नक्की कारण काय आहे? याची माहिती अद्याप समोर आली नाही.

News Title : Death threat to Eknath Shinde

महत्वाच्या बातम्या –

HMPV व्हायरसमुळे महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर; जाणून घ्या लक्षणं

नववर्षात गुड न्यूज, लाडक्या बहीणींनो 2100 रुपये ‘या’ दिवशी मिळणार?

17 मोबाईल नंबर, 100 बँक खाती अन्..; वाल्मिक कराडबाबत सुरेश धसांचा मोठा खुलासा

ब्रेकिंग! प्रसिद्ध निवडणूक विश्लेषक प्रशांत किशोर यांना अटक

‘खंडणीसाठी धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक?’; सुरेश धसांच्या आरोपांनी खळबळ

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now