मुलीला कन्या दिनानिमित्त द्या हटके शुभेच्छा; होईल खुश

On: September 21, 2024 10:46 AM
Daughters Day
---Advertisement---

Daughters Day l भारतात दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या चौथ्या रविवारी राष्ट्रीय कन्या दिन साजरा केला जातो. अशातच उद्या रविवारी, 22 सप्टेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. मुलींबद्दल प्रेम, कृतज्ञता आणि कौतुक व्यक्त करण्यासाठी राष्ट्रीय कन्या दिवस साजरा केला जातो. भारतासह अनेक संस्कृतींमध्ये, ऐतिहासिकदृष्ट्या पुत्रांना प्राथमिक वारस मानले गेले आहे.

मुली घराची शान असतात :

मुली या घराची शान असतात. कन्या म्हणजे भावाच्या आनंदाचे मूळ आणि आईच्या संकटावर मलमपट्टी म्हणून मुलीचे मूल्य आणि महत्त्व समजावून सांगण्यासाठी दरवर्षी ‘डॉटर्स डे’ साजरा केला जातो. मुलींना देवीचे रूप देखील मानले जाते. मुलीशिवाय घर अपूर्ण राहतं असं म्हणतात. मुलगी ही अशी भावना आहे, ज्याच्या नुसत्या उपस्थितीने सर्व संकटे नाहीशी होतात. न बोलता तिला तिच्या आई-वडिलांच्या सर्व समस्या समजतात. अशा परिस्थितीत एक तरी लेक असणे किती महत्त्वाचे आहे हे शब्दात व्यक्त करणे अशक्य आहे.

देशभरातील मुलींच्या हक्कांसाठी आवाज उठवणं आणि त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणं हे ‘कन्या दिवस’ साजरा करण्यामागचं मूळ कारण आहे. तसेच 2007 पासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. तसेच हा दिवस जागतिक स्तरावर साजरा केला जातो.

Daughters Day l तुमच्या मुलीला अशाप्रकारे द्या शुभेच्छा :

लेक वाचवा, देश घडवा.
कन्या दिनाच्या शुभेच्छा.

स्वागत तुझे मी असे करावे, अचंबित हे सारे जग व्हावे,
तुझ्या गोड हास्याने जीवन माझे फुलूनी जावे.
कन्या दिनाच्या शुभेच्छा.

मुलापेक्षा मुलगी बरी,
प्रकाश देते दोन्ही घरी
कन्या दिनाच्या शुभेच्छा.

माझा श्वास तू, माझा जीव तू,
माझ्या जगण्यासाचा अर्थ म्हणजे आपली छकुली.
कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझ्या केवळ अस्तित्वाने रोम रोम माझे झंकारले,
तूझ्या येण्याने जीवन माझे सार्थक झाले.
कन्या दिनाच्या शुभेच्छा.

News Title : Daughter’s Day Quotes In Marathi

महत्त्वाच्या बातम्या-

CIDCO ची घरे झाली स्वस्त, नवी मुंबईसाठी ‘या’ तारखेला निघणार लॉटरी

राज्यावर परतीच्या पावसापूर्वी मोठं संकट, IMD ने दिला महत्वाचा इशारा

मोठी बातमी! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक

आज संकष्टी चतुर्थीला बाप्पा ‘या’ राशींवर राहणार प्रसन्न!

जरांगे पाटलांची प्रकृती खुपचं ढासळली; सरकार काय पाऊल उचलणार?

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now