दत्ता गाडेने याआधीही…; पोलीस तपासातून धक्कादायक माहिती समोर!

On: March 2, 2025 9:09 AM
datta gade
---Advertisement---

Dattatray Gade | स्वारगेट बस स्थानकात एका शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार करून फरार झालेल्या आरोपीला अखेर 70 तासांच्या शोधमोहीमीनंतर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपी दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) याला पकडण्यासाठी 500 पोलिसांचा फौजफाटा, ग्रामस्थ, ड्रोन आणि श्वान पथकाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला.

शुक्रवारी रात्री शिरूर तालुक्यातील गुणाट (Gunat) गावात त्याला पकडण्यात आले. अटक झाल्यानंतर पोलिसांनी पुण्याला आणताना गाडीतच चौकशी सुरू केली, ज्यामध्ये गाडेने धक्कादायक माहिती दिली.

गाडे दररोज सावज शोधत असे-

आरोपी दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) रोज रात्री स्वारगेट, शिवाजीनगर आणि शिरूर एसटी स्टँडवर जाऊन महिलांचे सावज शोधत असे, असे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी त्याच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करत गेल्या दोन महिन्यांचे कॉल रेकॉर्ड्स तपासले असता, महिलांना फसवून जवळीक साधण्याचा त्याचा प्रयत्न असल्याचे दिसून आले. याआधीही तो स्वारगेट बस स्थानकावर मोबाईल चोरीच्या संशयावरून पोलिसांकडून ताब्यात घेतला गेला होता.

गाडेने (Dattatray Gade) यापूर्वीही काही महिलांसोबत अशाच प्रकारे अत्याचार केला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्राथमिक चौकशीत, तो महिलांशी गोड बोलून त्यांचे मोबाईल नंबर घेत असे आणि त्यांच्यासोबत जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा गुन्हा केवळ एकाच वेळी घडलेला नसून, आरोपी मागील काही काळापासून महिलांना फसवण्याचा प्रयत्न करत होता, अशी माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे.

शेतात लपून बसला होता आरोपी-

पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी ड्रोन आणि श्वान पथकाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. गुणाट गावातील उसाच्या शेतात तो लपल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवण्यात आली. मात्र, तो तिथे सापडला नाही. गुरुवारी रात्री साडेदहा वाजता तो नातेवाईक महेश बहीरट यांच्या घरी पाणी पिण्यासाठी आला होता. तिथेच त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली, असे स्थानिकांनी सांगितले.

यानंतर तो एका बेबी कॅनालजवळ लपून बसला होता. ग्रामस्थांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवले आणि त्याला अटक करण्यात आली. अखेर, तब्बल 70 तासांच्या शोधमोहीमेनंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. आता त्याच्यावर कडक कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

YouTube video player

News Title : Dattatray Gade troubled women before

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now