बीड प्रकरणाशी धनंजय मुंडेंच्या जोडल्या जाणाऱ्या कनेक्शनवर अजितदादांच्या नेत्याचं मोठं भाष्य!

On: January 1, 2025 11:41 AM
Dhananjay Munde
---Advertisement---

Dhananjay Munde l महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात झालेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांड प्रकरणी अनेक नवनवीन वळणं समोर आले आहेत. या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड पुणे येथील सीआईडी कार्यालयात शरण आल्यानंतर त्याला केज कोर्टाने 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दत्तात्रय भरणे यांनी बीड प्रकरणावर केलं भाष्य :

वाल्मिक कराड हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचं देखील कनेक्शन जोडलं जातं आहे. मात्र या प्रकरणात मंत्र्यांवर देखील कारवाई व्हावी अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी देखील केली आहे.

मात्र या सर्व घडामोडीनंतर अजित पवार गटाचे कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी दत्तात्रय भरणे यांनी बीड प्रकरणाशी धनंजय मुंडेंच्या जोडल्या जाणाऱ्या कनेक्शनवर भाष्य केलं आहे.

Dhananjay Munde l दत्तात्रय भरणे काय म्हणाले? :

बीड प्रकरणात धनंजय मुंडे यांचा कुठलाही संबंध असण्याची शक्यता नसावी, असं वक्तव्य दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. कारण अनेक जण मंत्र्यांचे मित्र असतात, मग त्यांनी गुन्हा केला म्हणून मंत्र्यांवर आरोप करणं हे कितपत योग्य आहे असा सवाल देखील दत्तात्रय भरणे यांनी उपस्थित केला आहे.

आज दत्तात्रय भरणे यांनी भीमा कोरेगाव येथे पत्रकारांशी संवाद साधताना हे महत्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. तसेच या प्रकरणात धनंजय मुंडे यांचं नाव समोर आल्यानंतर महायुतीच्या अनेक नेत्यांनी त्यांच्यापासून लांब राहणं देखील पसंत केलंय. मात्र अशातच आता दत्तात्रय भरणे यांनी मात्र धनंजय मुंडेंना पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला आहे.

News Title – Dattatray Bharane On Santosh Deshmukh Murder Case

महत्त्वाच्या बातम्या-

यंदाच्या वर्षी कोणता सण किती तारखेला? पाहा सर्व सणांच्या तारखा एका क्लिकवर

न्यू इयरला मिळाली आनंदवार्ता! सोनं झालं स्वस्त, पाहा आजचे दर

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गुड न्यूज, गॅस सिलिंडर ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त

तरुणांनो नववर्षात रेल्वेत तब्बल ‘इतक्या’ जागा भरल्या जाणार; ‘असा’ करा लगेच अर्ज

वाल्मिक कराडला धक्का, केज कोर्टात झाला मोठा निर्णय!

 

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now