उद्या ९ फेब्रुवारीला ‘या’ राशींचा नशिब फळफळणार!

On: February 8, 2026 5:05 PM
Today Horoscope
---Advertisement---

Daily Horoscope | 9 फेब्रुवारी 2026 रोजी अष्टमी तिथी, विशाखा नक्षत्र आणि कालाष्टमीचा विशेष योग तयार होत आहे. या ग्रहयोगांचा प्रभाव करिअर, व्यवसाय, आर्थिक व्यवहार आणि वैयक्तिक नातेसंबंधांवर दिसून येऊ शकतो. काही राशींना आज मोठ्या संधी मिळू शकतात, तर काहींनी प्रत्येक पाऊल जपून टाकण्याची गरज आहे. तर आज आपण जाणून घेऊयात उद्याच संपूर्ण राशीभविष्य…

राशिभविष्य :

मेष : ऑफिसमधील महत्त्वाच्या ऑनलाइन मीटिंगमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. मतभेद टाळून शांतपणे भूमिका मांडल्यास फायदा होईल. जुने कर-संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी दिवस अनुकूल आहे. व्यवसायात अचानक आर्थिक संधी मिळू शकतात.

वृषभ : व्यवसायिकांनी ग्राहकांशी वागणुकीत संयम ठेवावा. चुकीचा सूर दीर्घकालीन नुकसान करू शकतो. मोठी गुंतवणूक सध्या टाळलेली बरी. निधी मिळवण्यात अडथळे येऊ शकतात, मात्र भविष्यातील संधींसाठी योजना आखण्यास दिवस चांगला आहे.

मिथुन : शत्रू किंवा विरोधकांवर मात करण्यासाठी तुमची बुद्धिमत्ता उपयोगी ठरेल. व्यवसायात थकीत रक्कम वसूल होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल आणि आर्थिक लाभाचे संकेत आहेत.

कर्क : कामाच्या ठिकाणी काही जुन्या वादांचा पुनरुच्चार होऊ शकतो. व्यवसाय सुरळीत ठेवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. मात्र आर्थिक बाबतीत दिवस अनुकूल असून जुने संबंध फायदा करून देऊ शकतात.

सिंह : स्पर्धात्मक क्षेत्रात यश मिळेल. तांत्रिक क्षेत्रातील लोकांवर कामाचा ताण वाढू शकतो. एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून मदत मिळण्याची शक्यता आहे. खर्च वाढू शकतो, त्यामुळे बजेट सांभाळा.

कन्या : बोलताना जपून रहा, नाहीतर गैरसमज निर्माण होऊ शकतात. शत्रू तुलनेने मजबूत स्थितीत असल्याने सावध राहणे गरजेचे आहे. सकाळी मिळालेले पैसे संध्याकाळपर्यंत खर्च होऊ शकतात.

तूळ : उत्पादन व उद्योग क्षेत्रातील लोकांना मेहनतीचे फळ मिळेल. कुटुंब आणि काम यामधील समतोल राखण्यात यश मिळेल. नवीन उपकरणांवर खर्च होऊ शकतो. कमाई आणि प्रतिष्ठा दोन्ही वाढण्याचे संकेत आहेत.

वृश्चिक : मनःशांतीसाठी आत्मचिंतनाची गरज भासेल. भूतकाळातील चुकांमधून धडा घेऊन नवीन योजना आखल्यास फायदा होईल. जुन्या गुंतवणुकीतून आर्थिक लाभ संभवतो.

धनु : स्पर्धात्मक भावना वाढेल आणि कामात उत्साह दिसेल. सर्जनशील कल्पना तुम्हाला यश देऊ शकतात. नवीन भागीदारी करताना घाई करू नका. अनावश्यक खर्च टाळावा.

मकर : कामाचा ताण वाढेल आणि इतरांचे कामही तुमच्यावर येऊ शकते. वरिष्ठांशी वाद टाळा, नाहीतर अडचणी वाढू शकतात. आर्थिक बाबतीत दिवस प्रतिकूल आहे, त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा.

कुंभ : नवीन कल्पना आणि योजना यशस्वी ठरू शकतात. मित्र आणि सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल. गुंतवणूक करण्यापूर्वी सल्ला घ्या. करिअरमध्ये सकारात्मक बदल दिसू शकतात.

मीन : भावनिक निर्णय टाळून व्यवहारिक दृष्टिकोन ठेवा. नातेसंबंधात गैरसमज होऊ शकतात, संवादातून ते दूर करा. आर्थिक बाबतीत मध्यम फल मिळेल, मात्र संयम ठेवल्यास दिवस चांगला जाईल.

News Title: Daily Horoscope Today 9 February 2026 in Marathi – Know Which Zodiac Signs Will Shine

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now