सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ लोकांची दिवाळी होणार गोड

On: October 16, 2024 5:52 PM
DA Hike
---Advertisement---

DA Hike l केंद्र सरकारने आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी दिली आहे. देशातील सुमारे एक कोटी सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार असल्याचं बोललं जात आहे.

कर्मचाऱ्यांना सरकारने दिली आनंदाची बातमी :

केंद्र सरकारने सुमारे 49 लाख कर्मचारी आणि 60 लाख निवृत्तीवेतनधारकांचा महागाई भत्ता आणि महागाई सवलत म्हणजे डीए आणि डीआरमध्ये 3 टक्क्यांनी वाढ केली आहे. तसेच ऐन सणासुदीच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 3 टक्के वाढ मंजूर करण्यात आली आहे.

दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्क्यांवरून 53 टक्के करण्यात आला असून या निर्णयाला आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. यावेळी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना त्यांच्या ऑक्टोबरच्या पगारात मोठी वाढ मिळणार आहे. कारण 1 जुलै 2024 पासून महागाई भत्ता लागू होणार आहे. यामुळे महागाई भत्ता आणि महागाई सवलत या दोन्हीसाठी पात्र असलेल्यांना जुलै ते सप्टेंबर या कालावधीत वाढीव थकबाकी मिळेल

DA Hike l सरकारने आणखी दोन मोठे निर्णय घेतले :

मंत्रिमंडळाच्या निर्णयात कोस्टल शिपिंग विधेयकालाही मंजुरी देण्यात आली आहे. कोस्टल शिपिंग बिल 2024 या विधेयकाद्वारे किनारपट्टी भागांना कसा फायदा होईल याचीही घोषणा कॅबिनेट ब्रीफिंगमध्ये केली जाईल.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत रब्बी पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. तसेच यामध्ये 6 रब्बी पिकांचा MSP 2% वरून 7% करण्यात आला आहे आणि कमाल वाढ गव्हाच्या किमान आधारभूत किमतीवर करण्यात आली आहे.

News Title : DA Hike News

महत्वाच्या बातम्या-

राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! बड्या नेत्यानी सोडली महायुतीची साथ

“त्या 24 तास तुमच्या बरोबर असतात म्हणून…”; राष्ट्रवादीचा नेता भडकला

पुन्हा सत्ता आल्यास बहिणींना 3 हजार रुपये देणार; ‘या’ मंत्र्याचं आश्वासन

लॉरेन्स बिश्नोईच्या प्रेमाचा भयानक अंत, गर्लफ्रेंडमुळे बनला गँगस्टर

मी जे बोलतो ते करतो…; मराठा समाजाला मी स्वत: आरक्षण देणार

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now