वर्ल्ड चॅम्पियन गुकेशची नेटवर्थ किती?, आकडा ऐकून चकित व्हाल

On: December 13, 2024 12:22 PM
D Gukesh Net Worth
---Advertisement---

D Gukesh Net Worth | भारताच्या केडी गुकेशने बुद्धिबळाच्या जगात ऐतिहासिक कामगिरी करत भारताचे नाव जगभरात उंचावले आहे. वयाच्या केवळ 18 व्या वर्षी डी गुकेशने दिग्गज चिनी बुद्धिबळपटू डिंग लिरेनचा पराभव करून जागतिक बुद्धिबळ विजेतेपद पटकावले. या विजयासह गुकेशने बुद्धिबळाच्या 138 वर्षांच्या परंपरेतील सर्वात तरुण विश्वविजेता बनण्याचा विक्रम मोडला. (D Gukesh Net Worth )

डी गुकेश हा विश्वविजेता बनणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. त्याने डिंग लिरेनविरुद्ध 14 वा सामना जिंकून इतिहास रचला आहे. या विजयासह गुकेशला वयाच्या 18 व्या वर्षी कोट्यवधी मिळाले आहेत. जागतिक चॅम्पियनशिपपूर्वीच त्याची संपत्ती ही तब्बल 8.26 कोटी रुपये होती. आता चॅम्पियन बनल्यानंतर त्याच्या संपत्तीमध्ये आणखी वाढ झाली आहे.

डी गुकेशची एकूण संपत्ती-

डी गुकेशने 17 दिवसांत 11 कोटींहून अधिक कमाई केली आहे. सिंगापूर येथे 17 दिवस ही स्पर्धा चालली. 14 व्या आणि अंतिम सामन्यात त्याने चीनच्या दिग्गज डिंग लिरेनचा पराभव करत हा सामना 7.5-6.5 असा जिंकून इतिहास रचला. या विजयानंतर त्याचे जगभरातून कौतुक केले जात आहेत.  (D Gukesh Net Worth )

विश्वविजेता बनल्यानंतर गुकेशला 11.45 कोटी रुपये बक्षीस मिळाले. तर, चीनच्या डिंग लिरेनला 9.75 कोटी रुपये मिळाले. अंतिम डाव खेळणाऱ्या खेळाडूंना प्रत्येक सामना जिंकण्यासाठी 1.69 कोटी रुपये मिळतात. तसेच, उर्वरित रक्कम ही दोन्ही खेळाडूंमध्ये विभागली जाते. यामध्ये गुकेशने तीन सामने जिंकले. त्याने तिसरा, 11वा आणि 14वा सामना जिंकला.

वर्ल्ड चॅम्पियन बनण्यापूर्वीच डी गुकेशची संपत्ती ही 8.26 कोटी रुपये होती, जी आता 20 कोटींच्या पुढे गेली आहे. या वर्षी त्याने 3 मोठी जेतेपदे पटकावली. गुकेशने एप्रिलमध्ये झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या पात्रता स्पर्धा आणि ‘कॅन्डीडेट्स टूर्नामेंट’मध्ये भाग घेतला होता. आता त्याने जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिपच्या 14 व्या आणि अंतिम सामन्यात बाजी मारत भारताचे नाव उंचावले आहे. (D Gukesh Net Worth )

News Title –  D Gukesh Net Worth

महत्त्वाच्या बातम्या-

राज्यात पुन्हा राजकीय भूकंप?, दिल्लीत भाजप व शरद पवार गटातील ‘या’ बड्या नेत्यांची गुप्त भेट

काळजी घ्या! राज्यात ‘या’ तारखेपासून गारठा वाढणार?

गेल्यावर्षी 60 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमने मिळणारं सोनं आज पोहोचलं ‘इतक्या’ हजारांवर!

भाजप अजितदादा-एकनाथ शिंदेंना देणार मोठा धक्का?, आतली बातमी समोर

आज भोलेनाथ ‘या’ राशींवर करणार सुखाचा वर्षाव!

Join WhatsApp Group

Join Now