Maharashtra Weather | महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हवामानाचा तापमान बदल स्पष्टपणे जाणवत आहे. दिवसा उकाडा तर रात्री हलकी गार हवा सुरु झाली आहे. या हवामानातील बदलामुळे नागरिकांना गोंधळलेली स्थिती निर्माण झाली असताना, आता भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
कोकण (Kokan) आणि मध्य महाराष्ट्रासह राज्यातील काही भागांत पुन्हा पाऊस कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून तापमानात वाढ झाल्यामुळे उकाडा वाढला असून नागरिकांना अस्वस्थता जाणवत आहे. पुढील काही दिवसांत रात्रीची गारवा जाणवणार नाही, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. (Maharashtra Weather Update)
तापमान वाढीमागची कारणे काय? :
हवामान खात्याच्या माहितीनुसार, उत्तर दिशेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रवाह सध्या कमजोर झाला आहे. त्यामुळे तापमानात वाढ झाली असून थंडीचा जोरही कमी झाला आहे. यासोबतच पूर्वेकडून वाहणारे दमट वारे आणि वाढलेली आर्द्रता यांचा मिळून परिणाम राज्याच्या तापमानावर झाला आहे. त्यामुळे सध्या राज्यातील बहुतेक जिल्ह्यांत वातावरण कोरडे आणि गरम जाणवत आहे. (Maharashtra Weather Update)
नोव्हेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर काही दिवस थंडीचा अनुभव नागरिकांना आला होता. मात्र आता पुन्हा एकदा तापमानात वाढ झाल्यामुळे उकाडा जाणवू लागला आहे. या परिस्थितीसह, पुन्हा पावसाचा अंदाज असल्याने हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Maharashtra Weather | बंगालच्या उपसागरातून वेगाने येतंय संकट :
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात नवीन हवामान प्रणाली जलद गतीने विकसित होत आहे. येणाऱ्या काही दिवसांत ही प्रणाली एका तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Maharashtra Weather Update)
या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे, पुढील काही दिवसांत केरळ (Kerala), तामिळनाडू (Tamilnadu), लक्षद्वीप आणि किनारी आंध्र प्रदेशात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेषतः 25 ते 27 नोव्हेंबर दरम्यान तामिळनाडूला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानंतर 28 ते 30 नोव्हेंबर दरम्यान पाऊस अधिक तीव्र होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
दरम्यान, दिल्ली, हरियाणा आणि राजस्थानमध्ये देखील हवामानातील अचानक बदलामुळे हवेची गुणवत्ता गंभीर पातळीवर गेली आहे. त्यामुळे देशभरात हवामानाचा अस्थिर परिणाम स्पष्टपणे जाणवत आहे, ज्याचा परिणाम आता आरोग्यावरही होताना दिसत आहे.






